शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

कुपोषण रोखण्यासाठी टेलिमेडिसीन उपचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 00:42 IST

कुपोषित बालकांच्या उपचारास दोन दिवसांत निधी

अलिबाग : कर्जत तालुक्यातील १६ कुपोषित बालकांच्या तत्काळ उपचाराकरिता आवश्यक प्रत्येकी पाच हजार रुपये याप्रमाणे ८० हजार रुपयांचा निधी येत्या दोन दिवसांत देण्यात येईल. तसेच जिल्ह्यातील कुपोषणास आळा घालण्याकरिता ५२ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये टेलिमेडिसीन उपचार पद्धती सुरू करण्यात येईल. याअंतर्गत विविध प्रकारच्या ३२ वैद्यकीय चाचण्या करण्यात येतील आणि या टेलिमेडिसीन उपचार पद्धतीची सुरुवात कर्जत तालुक्यातून करण्यात येणार असल्याची माहिती रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरुवारी दिली.रायगड जिल्ह्यातील कुपोषण आणि माता-बाल मृत्यूंचे वाढलेले प्रमाण याबाबत ‘लोकमत’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर कर्जत येथील दिशा केंद्र सामाजिक संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते आणि रायगड जिल्हा लोकाधारित देखरेख व नियोजन प्रकल्पाचे समन्वयक अशोक जंगले, जगदीश दगडे, आकेश बिर्जे यांच्या शिष्टमंडळाने जिल्हा रुग्णालयात पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले. त्यानंतर तत्काळ जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांच्या कार्यालयात बैठक घेऊन वरील निर्णय घेण्यात आला.कर्जत तालुक्यातील कुपोषणास आळा घालण्याकरिता या ठिकाणी कायमस्वरूपी बाल उपचार केंद्र(सीटीसी) सुरू करण्याकरिता रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी यांनी एक संयुक्त प्रस्तावराज्य सरकारकडे सादर केला होता. त्यास आदिवासी विकास विभागाच्या गाभा संमितीने मंजुरीही दिली आहे. मात्र, हे बाल उपचार केंद्र अद्याप सुरू झाले नसल्याचे जंगले यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर पाठपुरावा करून हे केंद्र लवकरात लवकर सुरू करण्यात येईल, असे आश्वासन पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी गुरूवारच्या बैठकीत दिले.मोफत सोनोग्राफी सुविधाकुपोषण निर्मूलनाकरिता तातडीची उपाययोजना म्हणून जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ग्रामबाल पोषण केंद्र(व्हीसीडीसी) आणि बाल उपचार केंद्र(सीटीसी) कायमस्वरूपी सुरू करण्यात यावीत, आरोग्य विभाग आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या माध्यमातून बालकांची संयुक्त आरोग्य तपासणी करण्यात यावी, आरोग्य विभाग आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प यामधील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत, आदिवासी बांधवांचे स्थलांतर रोखण्याकरिता मधुमक्षिका व मत्स्यपालनाचा व्यवसाय उपलब्ध करून द्यावा, माता-बालमृत्यू रोखण्याकरिता आदिवासी क्षेत्रातील बालविवाह रोखणे आवश्यक असून त्याकरिता प्रभावी विशेष जनजागृती करणे, गरोदर मातांना सुयोग्य उपचार मिळण्याकरिता आवश्यक मोफत सोनोग्राफी यंत्र सुविधा तालुकास्तरावर उपलब्ध व्हावी, कर्जत तालुक्यातील गरोदर मातांकरिता अमलात आणली जाणारी डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजना जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांतही अमलात आणावी, अशा महत्त्वपूर्ण सूचना शिष्टमंडळाने लेखी निवेदनात केल्या. त्यावर पालकमंत्री चव्हाण यांनी लवकरच आवश्यक ते निर्णय घेतले जातील, असे सांगितले.जिल्ह्यात ८०९ कुपोषित बालकेरायगड जिल्ह्यात जुलै २०१८ अखेर एकूण ८०९ कुपोषित बालके असून, त्यापैकी मध्यम कुपोषण श्रेणीत ६७९ तर तीव्र कुपोषण श्रेणीत १२८ बालके असल्याने कुपोषण निर्मूलनाकरिता प्रभावी उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे शिष्टमंडळातील सदस्यांनी सांगितले.

टॅग्स :Healthआरोग्यMedicalवैद्यकीय