शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Tauktae Cyclone: रायगडच्या समुद्रकिनारी सापडले पाच जणांचे मृतदेह, मुंबई हाय दुर्घटनेतील कर्मचारी असण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2021 07:03 IST

Tauktae Cyclone: तौक्ते वादळाचा तडाखा मुंबई हाय परिसरात तेल विहिरींसाठी काम करणाऱ्या नौका आणि तराफांना बसून झालेल्या दुर्घटनेनंतर बेपत्ता  कर्मचाऱ्यांचा शोध सुरू असताना रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पाच मृतदेह आढळले आहेत.

रायगड : तौक्ते वादळाचा तडाखा मुंबई हाय परिसरात तेल विहिरींसाठी काम करणाऱ्या नौका आणि तराफांना बसून झालेल्या दुर्घटनेनंतर बेपत्ता  कर्मचाऱ्यांचा शोध सुरू असताना रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यांवर पाच मृतदेह आढळले आहेत. या मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. याबाबतची माहिती मुंबई पोलीस तसेच ओएनजीच्या अधिकाऱ्यांना दिल्याचे रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी सांगितले.शुक्रवारी सायंकाळी मुरूड समुद्रकिनारी स्थानिक नागरिकांना एक मृतदेह आढळला. लागोपाठ अलिबाग तालुक्यातील मांडवा परिसरात दोन, तर अलिबाग समुद्रकिनारी दोन मृतदेह सापडले. नागरिकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर रायगड पोलिसांनी हे मृतदेह ताब्यात घेतले. या मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यांचे डीएनएही घेण्यात येणार असून ओळख पटवण्यासाठी मुंबई पोलीस आणि ओएनजीसीच्या अधिकाऱ्यांची मदत घेतली जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक दुधे यांनी सांगितले.  

...तर दुर्घटना टळली असती!मुंबई : हवामान विभागाकडून धोक्याची सूचना मिळाल्यानंतरही तौक्ते चक्रीवादळ जास्त वेळ राहणार नाही, ते आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाही, या भ्रमात, कॅप्टन राकेश बल्लवने बार्ज पी-३०५ ला सुरक्षितस्थळी हलविले नाही. शिवाय आपत्कालीन परिस्थितीत त्यांनी डिस्ट्रेस सिग्नल दिला नाही, असा आरोप होत आहे.  १७ तास तरंगत केली मृत्यूवर मात !मुंबई : ताशी ६० ते ७० नॉट्स वेगाने वाहणारे वारे वाहात असताना १५ ते २० जण एकमेकांचे हात पकडून संध्याकाळी ५ ते सकाळी १० असे सुमारे १७ तास समुद्रात तरंगत होतो. मदतीसाठी आरडाओरड करत हाेताे, पण वाऱ्याचा वेग जास्त असल्याने मदतीला कोणी पोहोचले नाही, हा अनुभव अभियंता मुस्ताफिजुर रेहमान शेख यांनी कथन केला.  

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळRaigadरायगडMumbaiमुंबई