शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

"तटकरेंना दुर्बुद्धी झाली आणि ते भाजपसोबत गेले; लोकसभेचा माझा मार्ग मोकळा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2023 09:10 IST

माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे जाहीर मत

लोकमत न्यूज नेटवर्क, पाली: सुनील तटकरे हे रायगड लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे निश्चित होते. मात्र, त्यांना दुर्बुद्धी झाली आणि ते भाजपसोबत गेले. त्यामुळे माझा येथून निवडणूक लढविण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मला निवडणूक लढण्याचे आदेश दिले आहेत, असे जाहीर मत माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी येथे व्यक्त केले.

पाली येथे बल्लाळेश्वराच्या आशीर्वादाने त्यांनी रविवारी मेळावा घेत लोकसभा निवडणुकीचा नारळ फोडला. आगामी सर्व निवडणुकीच्या दृष्टीने  जोमाने तयारीला लागा, असे आवाहनही केले. रायगडमध्ये शेकाप-शिवसेना सर्व निवडणुका एकत्रित लढविणार असल्याची भूमिकाही जाहीर केली. गीते यांनी भाजप व शिंदे गटावर जोरदार निशाणा साधला. भाजप सत्तेसाठी वेडा झाला आहे. त्यांना महाराष्ट्राची, इथल्या जनतेची चिंता नाही. त्यांना खुर्चीची चिंता आहे. जनता यांना चांगला धडा शिकवणार असल्याचे ते सांगितले. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे, सहसंपर्कप्रमुख किशोर जैन, उपजिल्हा संघटक राजेंद्र राऊत, तालुकाप्रमुख दिनेश चिले यांनीही मनोगत व्यक्त केले.

शिवसेनेत इन कमिंग

 सध्या ठाकरे शिवसेनेत जोरदार इन कमिंग सुरू असून मातोश्रीवर रोजच प्रवेश होत आहेत.  आता पेणचे शिशिर धारकर व समीर म्हात्रे हेदेखील मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सोमवारी प्रवेश करणार असल्याची माहिती अनंत गीते यांनी दिली.

टॅग्स :Anant Geeteअनंत गीतेsunil tatkareसुनील तटकरे