शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचार करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा; रोह्यात भाजपचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 22:51 IST

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण

रोहा : अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार करणाºयावर त्वरित कारवाई करा, या प्रकरणात दिरंगाई करणाºया दोषी पोलिसांवर तातडीने कारवाई करा, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाने शुक्रवारी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा अ‍ॅॅड. माधवी नाईक, जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या नेतृत्वाखाली रोह्यात मोर्चा काढून उपविभागीय पोलीस अधिकारी, रोहा यांना निवेदन दिले.

शहरात गतिमंद मुलीवर ५५ वर्षीय नराधमाने अत्याचार केले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात टाळाटाळ केली. जनतेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर अखेर गुन्हा नोंदविण्यात आला. पीडितेला न्याय देण्याऐवजी प्रकरण दडपण्यासाठी तिच्या कुटुंबीयांना पैशाचे प्रलोभन दाखविले गेले. तिला न्याय देण्यासाठी पुढे आलेल्या तरुणांना पोलिसांनी धमकीवजा नोटिसा बजावल्या. याविरोधात आवाज उठवण्यासाठी भाजपच्या वतीने शुक्रवारी मोर्चा काढला.

रोह्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी किरणकुमार सूर्यवंशी यांना निवेदन दिले. या वेळी पनवेलच्या महापौर कविता चौतमल, जिल्हा युवक अध्यक्ष अमित घाग, राज्य कार्यकारिणीचे संजय कोनकर, तालुकाध्यक्ष सोपान जांभेकर, मेघना ओक, जयश्री भांड, श्रद्धा घाग, ज्योती सनीलकुमार आदी उपस्थित होते. शहरातील राम मारुती चौकातून मोर्चा सुरू झाला. तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.

टॅग्स :BJPभाजपा