शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

मुरुडमध्ये रताळ्यांचा बाजार फुलला, पण ग्राहकच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2021 00:14 IST

महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला बाजार : भाव घसरले

संजय करडे

मुरूड : दरवर्षी महाशिवरात्र असण्याच्या तीन दिवस अगोदर कोर्लई येथील शेतकरी मोठ्या संख्येने आपल्या शेतात पिकविलेले रताळे विकण्यासाठी मुरुड शहरातील बाजारपेठेत येत असतात. शेकडो टन माल घेऊन येऊन मोठ्या प्रमाणात रताळ्याची विक्री करीत असतात. कोर्लई येथील रताळे खूप प्रसिद्ध असून, ही रताळी विकत घेण्यासाठी मोठी गर्दी होत असते, परंतु यंदा कोरोना व आर्थिक मंदीमुळे लोकांच्या हाताला असणारे काम गमावल्यामुळे रताळी खरेदीसाठी फार अल्प प्रतिसाद मिळत असल्याने दिसून येत आहे. माल विकणाऱ्या व्यापाऱ्यांनी रताळ्याचे भाव कमी करूनही रताळी घेण्यासाठी गर्दी दिसून येत नाही. ग्राहक नसल्याने माल विकणारे व्यापारी त्रस्त व हैराण झाले आहेत.

मागील वर्षी रताळी ८० रुपये किलोने विकली गेली, परंतु यंदा रताळ्याचे पीक भरघोस येऊनही रताळी विकत घेण्यासाठी गिऱ्हाईकच नाही. त्यामुळे उत्कृष्ट रताळी असूनही विक्रीला प्रतिसाद नसल्याने बाजारात शांतता दिसून येत आहे. महाशिवरात्रीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी रताळ्याची शेती मोठ्या प्रमाणात करून भरघोस आवक प्राप्त करण्याचा त्याचा प्रयत्न असतो, परंतु यंदा बाजारातील ग्राहक खरेदी करीत नसल्याने रताळ्याचे भाव मोठ्या प्रमाणात घसरले आहेत. उपवासासाठी लागणारी गावठी लालचुटूक गोड रताळ्यांची कोर्लई गावातून सुमारे ५०० क्विंटलची आवक वाढली आहे.गोड बटाटा अर्थात स्वीट पोटॅटो म्हणून जगभर ओळख असलेले गोड कंदमुळ रताळे बहुधा उपवासासाठी विशेषतः महाशिवरात्रीला वापरले जाते. 

४० ते ५० रुपये किलोला दरदरवर्षीप्रमाणे या वर्षी मुरुड नगरपरिषदेतर्फे रताळे बाजारात विद्युत पुरवठा व मंडपाची सुविधा उपलब्ध न केल्यामुळे सुमारे ४० महिला विक्रेतींना पदरमोड करून मंडप घालावा लागल्याचे लोना मार्तिस यांनी सांगितले, तर गेल्या वर्षी ८० ते ९० रुपये किलोला आकारले तरी मागणी होती, परंतु या वर्षी उत्पादन वाढले असून, ४० ते ५० रुपये इतका कमी दर असूनही मालाला अपेक्षित उठाव नसल्याचे महिला बचत गट प्रमुख अजेलीन डिसोझा यांनी सांगितले.

उत्पन्नात गेल्या वर्षापेक्षा दुप्पट वाढयंदा रताळ्याचे उत्पन्न गेल्या वर्षापेक्षा दुप्पट वाढ झाली असून, प्रति किलो ५० रुपये भाव असूनही कोरोनामुळे फारसा रताळ्यांना मागणी नसल्याने शेतकरी तोट्यात असल्याने नाराजीचे वातावरण दिसत आहे. या वर्षी अधिक मास आल्याने रताळे पिकविण्यास पुरेसा अवधी मिळाला. परिणामी, अडीच तीन महिन्यांचा कालावधी मिळाल्याने भरघोस पीक मिळू शकले. मात्र, रताळ्याला मोठ्या प्रमाणावर मागणी नसल्याने जेमतेम उत्पादन खर्च निघाल्याचे रताळी उत्पादक शेतकरी रॉक रुसारीयो यांनी सांगितले. 

टॅग्स :RaigadरायगडMahashivratriमहाशिवरात्री