शहरं
Join us  
Trending Stories
1
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
4
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
5
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
8
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
9
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
10
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
11
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
12
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
13
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
14
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
15
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
16
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
17
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
18
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
19
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी

पर्यटकांना खुणावतोय सर्वे धबधबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2019 23:48 IST

निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारे व प्राचीन मंदिरांना पर्यटकांची नेहमीच पसंती मिळते;

दिघी : निसर्गाचा वरदहस्त लाभलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील समुद्रकिनारे व प्राचीन मंदिरांना पर्यटकांची नेहमीच पसंती मिळते; परंतु पावसाळा सुरू झाला की पर्यटकांचा ओघ डोंगररांगावरून कोसळणाऱ्या धबधब्याकडे वळू लागतो. श्रीवर्धन तालुक्यातील सर्वे येथील एक धबधबा पर्यटकांसाठी पर्वणी आहे.सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाला शांत, निवांतपणे, आनंदात जगता येईल अशी क्षणभर विश्रांती हवी असते. आठवडाभराचा कामाचा ताणतणाव दूर करण्यासाठी गावात किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जाऊन निसर्गाच्या सानिध्यात सुट्टी घालवायला प्रत्येकालाच आवडते. हिरवीगार झाडे, रंगबिरंगी फुले, निरनिराळे पक्षी आणि खळाळणारा धबधबा, असे मनमोहक रूप डोळ्यांसमोर दिसताच दिवसभराचा थकवा कधी गायब होतो कळतही नाही. असेच काहीसे सर्वे येथील धबधबा पाहताना अनुभवास मिळत असल्याने तरुणांकडून सांगण्यात आले. पावसाळा सुरू असल्याने सर्वे धबधब्यावर भिजण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.एसटीच्या ठरावीक फेºया असल्याने पर्यटकांना खासगी वाहनांनी जाण्यास सोयीचे ठरेल. कोणत्याही प्रकारचे दिशादर्शक फलक नसल्यामुळे नवीन येणाºया पर्यटकांची दिशाभूल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.सर्वे गावाच्या आधी जवळपास अर्धा कि.मी. अंतरावर उजवीकडील पायवाट धबधब्याचा दिशेने जाते. जंगलक्षेत्रात धबधबा असल्याने दूरवरून जाणीव होत नाही. जवळपास अर्धा किलोमीटर गेल्यावर धबधब्याचा आवाज स्पष्ट ऐकू येतो.जंगल भ्रमंती करत अखेर कोसळणारा धबधबा पर्यटकांचे लक्ष वेधून घेतो. दर शनिवार, रविवारी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येथे येत आहेत. धबधब्यासोबत सेल्फी घेताना पर्यटक दिसतात. वनभोजनाचा अविस्मरणीय अनुभव घेता येतो. धबधब्याच्या प्रचंड वेगामुळे कातळाची झीज झाल्याचे दिसून येते. सार्वजनिक वाहतुकीच्या गैरसोयीमुळे येथे येणाºया पर्यटकांची नाराजी दिसते. पर्यटकांची संख्या वाढली तर स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकेल. पर्यटनाला चालना देण्यासाठी या ठिकाणी सुविधांची गरज आहे.>कसे जाणार?बोर्ली पंचतनपासून आदगाव मार्गे १६ कि.मी. अंतरावर धबधब्यावर खासगी वाहनांनी जाता येऊ शकते. इथून जवळच आदगाव, वेळासचा नयनरम्य समुद्रकिनारा, नानवेलची बत्ती ही पर्यटनस्थळे आहेत.