शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
11
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
12
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
13
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
14
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
15
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
16
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
17
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
18
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
19
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
20
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार

केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना पराभवाचा मोठा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 12:04 AM

केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे अनंत गीते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी ३१४३८ मतांनी पराभव केला.

रायगड: लोकसभा मतदारसंघाच्या अटीतटीच्या निवडणुकीत केंद्रीय मंत्री आणि शिवसेनेचे अनंत गीते यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी ३१४३८ मतांनी पराभव केला. २०१४मधील आपल्या निसटत्या विजयाचा त्यांनी वचपा काढला आहे. तटकरे नामसाधर्म्याचे दोन उमेदवार मते खाण्याकरिता सेनेच्या माध्यमातून उभे केले होते. मात्र, त्याचा फायदा गीते यांना झाला नाही. दोन्ही उमेदवारांना १३०८५ मते मिळूनदेखील तटकरे ३१४३८ मताधिक्याने विजयी झाले.रत्नागिरीत चार वेळा आणि रायगडमध्ये दोन वेळा असे सहा वेळा अनंत गीते विजयी होऊन खासदार बनले होते. मात्र, २०१९ च्या निवडणुकीत मोदी लाटेतदेखील तटकरे यांनी आपले वेगळेपण शेतकरी कामगार पक्ष आणि काँग्रेसच्या सहयोगाने विजयी होत सिद्ध केले आहे. अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात रिंगणात जरी १६ उमेदवार होते तरी खरी लढत केंद्रीय मंत्री भाजप-शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्यातच झाली. अंतिम निकालानुसार सुनील तटकरे यांनी ४ लाख ८६ हजार ९६८ मते मिळवून गीते यांचा तब्बल ३१ हजार ४३८ मतांनी पराभव केला. गीते यांना ४ लाख ५५ हजार ५३० मते मिळाली आहेत. सर्वाधिक मते मिळालेल्या सुनील दत्तात्रेय तटकरे यांना जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी विजयी घोषित केले. मतमोजणीच्या एकूण ३० फेऱ्या झाल्या.शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी शेकापचा संपूर्ण पाठिंबा देऊन तटकरे यांना विजयी करण्याचा बांधलेला चंग आणि त्याच वेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजीचे मुद्दे दूर करून मनोमिलन करण्यात सुनील तटकरे आणि जिल्हा काँग्रेस अध्यक्ष महाडचे माजी आमदार माणिक जगताप यांना आलेले यश हे तटकरे यांच्या विजयास कारणीभूत ठरू शकले आहे.भाजप-सेना सलोखा होऊन मतभेद दूर झाले आहेत. परिणामी, विजय नक्की, असा दावा शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी रायगडमधील प्रचारसभेत केला होता; परंतु फळास आला नाही. वंचित बहुजन आघाडीच्या सुमन कोळी यांना २३१९६ तर शिवसेनेकडून उभा करण्यात आलेला अपक्ष उमेदवार सुभाष पाटील यांना १२२६५ मते मिळाली. अलिबागचे स्थानिक आमदार पंडित पाटील यांच्या नावाशी साधर्म्य असणारे उमेदवार उभे केल्यावर ते शेकापची मते घेतील आणि तटकरेंची कमी होतील, अशी राजकीय क्लृप्ती त्यामागे होती.राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे अपक्ष उमेदवार सुनील पी. तटकरे यांना ४१२६ तर सुनील एस. तटकरे यांना ९७५२ मते मिळाली आहेत. या दोघा उमेदवारांना एकूण १३७७८ मते मिळून देखील सुनील तटकरे विजयी झाले आहेत, हे वैशिष्ट्यपूर्ण मानले जात आहे. शिवसेना-भाजपच्या समन्वयात अभाव राहिल्याने अपयश आल्याची प्रतिक्रिया भाजप कार्यकर्त्यांनी दिली.>१९५२ मध्ये झालेल्या पहिल्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन कुलाबा लोकसभा मतदारसंघातून रोह्याचे सुपुत्र डॉ. सी. डी. देशमुख विजयी होऊन, भारताचे पहिले अर्थमंत्री झाले होते आणि २०१९ मध्ये पुन्हा एकदा रोह्याचेच सुपुत्र आणि जे राज्याचे अर्थमंत्री होते, असे सुनील तटकरे रायगडचे खासदार म्हणून विजयी झाले आहेत. याचा आनंद रोहेकर मतदार व्यक्त करीत आहेत. मुस्लीम मते आपल्याला मिळवण्याकरिता सेनेने रायगड माजी खासदार बॅ. ए. आर. अंतुले यांचे पुत्र नाविद अंतुले यांना शिवसेनेत प्रविष्ट करून घेऊन त्यांना गीतेंच्या प्रचाराकरिता फिरवण्यात आले. मात्र, मुस्लीम मतदारांनी ही राजकीय क्लृप्ती विचारात घेऊनच मतदान केले. परिणामी श्रीवर्धन या मुस्लीम बहुल विधानसभा मतदारसंघात तटकरे यांना विक्रमी मताधिक्य मिळाले.

टॅग्स :raigad-pcरायगडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019