शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘दिशा डायरेक्ट’च्या भागीदाराची आईसह आत्महत्या, अर्णब गोस्वामींसह तीन जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2018 19:28 IST

दिशा डायरेक्ट कंपनीचे भागीदार प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व आर्किटेक्ट अन्वय मधुकर नाईक (५४) आणि त्यांच्या आई कुमुद मधुकर नाईक (८४) यांचे मृतदेह शनिवारी त्यांच्या कावीर गावातील फार्महाउसमध्ये आढळले. विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

- जयंत धुळप 

अलिबाग - दिशा डायरेक्ट कंपनीचे भागीदार प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक व आर्किटेक्ट अन्वय मधुकर नाईक (५४) आणि त्यांच्या आई कुमुद मधुकर नाईक (८४) यांचे मृतदेह शनिवारी त्यांच्या कावीर गावातील फार्महाउसमध्ये आढळले. विष प्राशन करून त्यांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, आयकास्ट/एस.के. मीडियाचे फिरोज शेख, स्मार्टवर्कचे नितेश सरडा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शनिवारी सकाळी मोलकरीण फार्महाउसवर आली असता ही घटना उघड झाली. दोन्ही मृतदेह दुपारी येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले. नाईक कुटुंबीयांचे जबाब नोंदविण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. अलिबागजवळच्या कावीर या गावात नाईक कुटुंबीयांचे फार्महाउस असून काही वर्षांपासून नाईक येथे राहत होते. रिअल इस्टेट क्षेत्रातील मंदीमुळे नुकसान झाल्याने त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता आहे.पैसे न मिळाल्याने घेतला निर्णय?अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षया यांनी अलिबाग पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार अन्वय यांनी अर्णब गोस्वामी, फिरोज शेख व नितेश सरडा यांच्या कंपन्यांसाठी काम केले होते. मात्र त्याचे पैसे न मिळाल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले.अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी, आयकास्ट/एस.के. मीडियाचे फिरोज शेख, स्मार्टवर्कचे नितेश सरडा यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे रायगडचे जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी सांगितले.

टॅग्स :Suicideआत्महत्याCrimeगुन्हाRaigadरायगडRepublic TVरिपब्लिक टीव्हीarnab goswamiअर्णब गोस्वामी