शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोकणच्या खाऱ्या हवेत स्ट्रॉबेरीची यशस्वी शेती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 05:42 IST

काळ्या मातीत लागवड; तरुण शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग

- जयंत धुळप अलिबाग : स्ट्रॉबेरी ही महाबळेश्वरच्या थंड हवेत आणि लालमातीतच होते, असे मानले जाते. परंतु अलिबाग तालुक्यातील खानाव येथील तरुण शेतकरी केतन पाटील यांनी आपल्या शेतातील काळ्या मातीत गेल्या तीन वर्षांपासून स्ट्रॉबेरीची लागवड करून स्ट्रॉबेरीचे उत्पादन खाºया हवेत आणि काळ्या मातीतही होऊ शकते, हे सिद्ध केले आहे. विशेष म्हणजे, कोणत्याही रासायनिक खतांशिवाय संपूर्ण सेंद्रिय पद्धतीने त्यांनी स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले आहे.समाज माध्यमांद्वारे त्यांनी महाबळेश्वरमध्ये केली जाणारी शेती पाहिली. त्यानंतर, त्यांनी यू-ट्यूबवरून स्ट्रॉबेरी झाडांची लागवड, मशागत आणि उत्पादन कसे घ्यायचे, याबाबत माहिती मिळविली. तीन वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर त्यांनी स्ट्रॉबेरीच्या १० ते १५ झाडांची आपल्या शेतात लागवड करून मशागत केली. त्यांना चांगली फळे आली, त्यातून त्याचा उत्साह वाढला आणि दुसºया वर्षी त्यांनी पावसाळा संपल्यावर नोव्हेंबरमध्ये स्ट्रॉबेरीच्या ५० झाडांची लागवड केली. डिसेंबर महिन्यात स्ट्रॉबेरीची फळे येण्यास प्रारंभ झाला. एकूण पंधरा ते वीस किलोंच्या आसपास स्ट्रॉबेरीची फळे आली. त्यातून त्यांचा हुरूप वाढला आणि नोव्हेंबर, २०१८ मध्ये त्यांनी स्ट्रॉबेरीची तब्बल ५०० रोपे लावून चांगली मशागत केली. डिसेंबर अखेर आणि जानेवारी, २०१९च्या प्रारंभास स्ट्रॉबेरीचे उत्पादन सुरू झाले. दररोज सुमारे दीड ते दोन किलो उत्पादन मिळत असल्याचे केतन पाटील यांनी सांगितले.तीन महिने घेता येईल उत्पादनमहाबळेश्वर पाचगणीमध्ये बाराही महिने स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते. तसे आपल्याकडे शक्य होणार नाही, परंतु पावसाळा संपल्यावर नोव्हेंबर ते जानेवारी या थंडीच्या तीन महिन्यांत चांगले उत्पादन घेता येऊ शकते. समुद्रकिनाºयाच्या खाºया हवेत स्ट्रॉबेरी होऊ शकते, हे या निमित्ताने सिद्ध झाले आहे. मात्र, थंड हवामान राखण्याकरिता कृत्रिमरीत्या व्यवस्थापन करावे लागले, असाही अनुभव त्यांनी सांगितला.नफ्यातील शेतीचा आगळा वस्तुपाठकेतन यांनी २७ एकर शेतीवर स्ट्रॉबेरीसह विविध कृषी उत्पादनांचे प्रयोग केले. अलिबागच्या पांढºया कांद्यासह लाल कांद्याचे उत्पादन गेली अनेक वर्षे घेत आहेत. आंब्याच्या हापूस, पायरीसह विविध दहा जातींची ५००पेक्षा अधिक झाडे त्यांनी जोपासली आहेत. टरबूज, वांगी, नवलकोल, अ‍ॅपल बोर, कोबी, मिरची, काकडी, राई, मटार, वाल अशा फळभाज्या बारा महिने घेण्याचा प्रयोग यशस्वी करून तालुक्यात नफ्यातील शेतीचा आगळा वस्तुपाठ घालून दिला.

टॅग्स :Farmerशेतकरीalibaugअलिबाग