शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांनी उलगडले वन्यजीवांचे रहस्य, पर्यावरण संवर्धनासाठी ई-मॅमल प्रकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 00:38 IST

Wildlife News : माणगाव तालुक्यातील पाटणूस येथील कुंडलिका विद्यालय ही शाळा ई-मॅमल प्रकल्प राबवणारी रायगड जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे.

- विनोद भोईरपाली : माणगाव तालुक्यातील पाटणूस येथील कुंडलिका विद्यालय ही शाळा ई-मॅमल प्रकल्प राबवणारी रायगड जिल्ह्यातील एकमेव शाळा आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी जंगलात ट्रॅप कॅमेरा लावून परिसरातील विविध वन्यजीवांची माहिती घेत आहेत. त्याबरोबरच पर्यावरण संवर्धन व जनजागृती केली जात आहे.प्रकल्पात आदिवासी विद्यार्थ्यांचा पुढाकार सर्वाधिक आहे. प्रकल्पाच्या माध्यमातून वन्यजीवांवर आधारित निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या उत्साह व कुतूहलात आणखी भर पडत आहे. हा प्रकल्प राबविणारे शिक्षक राम मुंढे यांनी सांगितले की, आतापर्यंत अनेक वन्यजीव ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. हे वन्यजीव वेगवेगळ्या प्रकारचे असल्याने विद्यार्थी, पालक आणि स्थानिक लोक यांना देखील या वन्यजीवांविषयी विशेष आवड निर्माण झाली आहे. सर्वात विशेष महत्वाची बाब म्हणजे ट्रॅप कॅमेऱ्यात बिबटे देखील कैद झाले आहेत.बिबट्यांच्या वावर पाटणुसच्या अवतीभोवती असला तरी त्यांनी आतापर्यंत कोणावरही हल्ला नाही केला. याचे कारण म्हणजे बिबट्यांना मुबलक प्रमाणात असलेले खाद्य आहे. शाळेत आदिवासी विद्यार्थ्यांची संख्या जवळपास ९० टक्के आहे. या विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी त्याचप्रमाणे वन्यजीवांची गोडी लागावी म्हणून हा प्रकल्प २०२१ पासून पुन्हा सुरू करण्यात आला  आहे. जंगलात जाऊन ट्रॅप कॅमेरा लावून वन्यजीवांचा अभ्यास करायचा प्रकल्प  बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण आणि आयसीआयसीआय बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प कुंडलिका विद्यालयात सुरू आहे. जंगलात जाऊन विद्यार्थ्यांकडून ट्रॅप कॅमेरा लावायचा आणि परिसरामधील वन्यजीवांचा अभ्यास करायचा हा प्रकल्प आहे.   मागील ३ वर्षांपूर्वी ‘ई-मॅमल’ प्रकल्प कुंडलिका विद्यालयात सुरू झाला होता. हा प्रकल्प एक वर्षासाठी होता परंतु तो पुढे चालू ठेवण्यास सांगितल्यामुळे सातवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांना घेऊन हा प्रकल्प राबविण्यात येत होता.   यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने प्रकल्प सुरू ठेवणे अवघड होते तरी देखील आदिवासी विद्यार्थ्यांची सतत विचारणा असल्याने शाळा सुरू होण्याच्या अगोदर प्रकल्प सुरू करण्याचा विचार केला आणि शनिवारी शाळेतील विद्यार्थ्यांसोबत जंगलात जाऊन ट्रॅप कॅमेरा लावण्यात आला असे शिक्षक राम मुंढे यांनी सांगितले.

टॅग्स :wildlifeवन्यजीवRaigadरायगड