शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

शाळेसाठी विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास

By admin | Updated: July 21, 2015 04:57 IST

रायगड किल्ल्याच्या कुशीत, टकमक टोकाच्या खाली असलेल्या छत्रीनिजामपूर या गावातील इयत्ता ५ वी ते १० वीमधील ४५ आदिवासी विद्यार्थ्यांना

जयंत धुळप ,अलिबागरायगड किल्ल्याच्या कुशीत, टकमक टोकाच्या खाली असलेल्या छत्रीनिजामपूर या गावातील इयत्ता ५ वी ते १० वीमधील ४५ आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून पावसाळ््यात जीवावर उदार होवून काळ नदी पार करावी लागत आहे. छत्रीनिजामपूर आणि वारंगी दरम्यानच्या काळ नदीवरील पूल तीन वर्षांपूर्वी पुरात वाहून गेला. मात्र शासकीय यंत्रणेस पूल तुटल्याचा पत्ताच नसल्याने मुलांना जीव धोक्यात घालून, नदी पार करुन वाघेरी-वारंगी येथील जयजवान जयकिसान माध्यमिक विद्यालयात यावे लागते. साकव दुरूस्त करण्यासाठी संबंधित लघुपाटबंधारे विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. परिणामी शाळेत येण्याकरिता तब्बल तीन किमीची पायपीट ४५ आदिवासी विद्यार्थ्यांना दररोज करावी लागते. दररोजच्या सहा किमीची पायपीट वाचविण्याकरिता हे विद्यार्थी तुटलेल्या पुलाच्या बाजूने काळ नदीच्या पात्रात उतरुन, जीव धोक्यात घालून मानवी साखळी करुन नदी पार करतात. अतिवृष्टी झाल्यास पाण्याच्या पातळीत मोठी वाढ होते. अशा वेळी प्रवाहात वाहून जाण्याची भीती असते, परंतु फेरा वाचविण्यासाठी विद्यार्थी नदी पार करत असल्याचे जयजवान जयकिसान माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कदम यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी पूल(साकव) नव्याने बांधण्यात यावा, याकरिता शाळा सुरु झाल्यावर जयकिसान माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष कदम यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना एक निवेदन पाठवून सर्व गंभीर परिस्थिती लक्षात आणून दिली. परंतु महिनाभरात त्यावरही कोणतेही आदेश झाले नाही आणि कार्यवाहीचा तर पत्ताच नाही. छत्रीनिजामपूर आदिवासीवाडी आणि वारंगी गावाचा साकव गेल्या तीन वर्षांपूर्वी मोडला आहे. हा साकव दुरूस्तीसाठी संबंधित लघुपाटबंधारे विभागाने अक्षम्य दुर्लक्ष केले आहे. तब्बल तीन किलोमीटर अंतराची पायपीट करुन या ४५ आदिवासी विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागते. जाता-येता दररोजच्या सहा किमी अंतराची पायपीट वाचविण्याकरिता ही मुले तुटलेल्या पुलाच्या शेजारुनच काळ नदीपात्रातून जीव धोक्यात घालून मानवी साखळी करुन दररोज नदी पार करतात. अतिवृष्टी होत असेल तर या नदीची पातळी वाढते. अशा वेळी या प्रवाहात वाहून जाण्याची भीती असते, परंतु या मुलांना तो धोका पत्करुन नदी पार करावी लागते. आदिवासी विद्यार्थ्यांच्या या समस्येवर मार्ग निघावा, पूल(साकव) नव्याने बांधण्यात यावा याकरिता स्थानिक ग्रामस्थांनी महाड सार्वजनिक बांधकाम विभागास देखील याची कल्पना दिली होती, परंतु त्यांच्याकडूनही कोणतीही कार्यवाही झाली नाही. अखेर यंदा शाळा सुरु झाल्यावर शाळेचे मुख्याध्यापक संतोष कदम यांनी राज्याचे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांना एक निवेदन पाठवून सर्व गंभीर परिस्थिती लक्षात आणून दिली. परंतु महिनाभरात त्यावर कोणतेही आदेश झाले नाही. महाडचे आमदार शिवसेनेचे भरतशेठ गोगावले आहेत. त्यांच्या माध्यमातून या ४५ विद्यार्थ्यांची समस्या सुटावी, अशी अपेक्षा छत्रीनिजामपूर ग्रामस्थांची आहे.