शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महानगरपालिका शाळेतील पटसंख्या घसरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2020 01:59 IST

गेल्या चार वर्षांतील पालिकेच्या शाळांतील पटसंख्येचा आलेख उतरता असल्याचे दिसून येत आहे.

- वैभव गायकरपनवेल - पनवेल महापालिकेच्या शाळांची पटसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. सद्यस्थितीत दहापैकी नऊ शाळा आयएसओ मानांकन प्राप्त असतानाही पालिकेच्या शाळांकडे विद्यार्थी पाठ फिरवत आहेत. गेल्या चार वर्षांतील पालिकेच्या शाळांतील पटसंख्येचा आलेख उतरता असल्याचे दिसून येत आहे.पनवेल क्षेत्रात महापालिकेच्या दहा शाळा आहेत. यामध्ये सात मराठी, दोन उर्दू, एका गुजराती शाळांचा समावेश आहे. २०१६ मध्ये पनवेल महपालिकेची स्थापना झाली. पालिकेचा विस्तार वाढला. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील शाळांचे अद्याप हस्तांतर पालिकेकडे झाले नसले तरी पालिकेच्या मालकीच्या शाळांचा दर्जा ढासळत चालला असल्याचे मागील चार वर्षांच्या पटसंख्येवरून स्पष्ट होत आहे.दहा शाळांमध्ये एकूण ७४ शिक्षक कार्यान्वित आहेत. या शिक्षकांना वेतनासाठी सुमारे साडेतीन कोटींचा खर्च येतो. या व्यतिरिक्त १६ लाख रुपये आयत्या वेळी करावयाचा खर्च, समारंभ, खेळ व विद्यार्थी गुणगौरव याकरिता दहा लाख, शाळा देखभाल खर्च २२ लाख, ई-लर्निंग १८ लाख, गणवेश १५ लाख, सानुग्रह अनुदान १२ लाख आदी खर्च केला जातो. याकरिता ८० टक्के शासनाचे अनुदान तर २० टक्के महापालिकेला खर्च उचलावा लागतो.वर्षभरात चार कोटींपेक्षा जास्त निधी खर्चूनही पालिकेची पटसंख्या वाढविण्यात प्रशासनाला अपयश आले आहे. एकीकडे पनवेल महापालिकेकडे जिल्हा परिषदेच्या शाळांचा हस्तांतराचा विषय प्रस्तावित असताना पालिकेच्या मालकीच्या शाळांची घसरणारी पटसंख्या चिंतेचा विषय बनत आहे. पनवेलसारख्या शहरात इंग्रजी माध्यमांच्या शाळा मोठ्या प्रमाणात आहेत. मराठी माध्यमाच्याही विविध शाळा या ठिकाणी कार्यरत असताना इतर शाळांच्या तुलनेने पालिकेच्या शाळांमध्ये तोडीस तोड शिक्षणाची गरज आहे. महापालिकेच्या मार्फत पटसंख्या वाढीसाठी विविध प्रयत्न केले जात आहेत, याकरिता राखीव निधीदेखील वापरला जात असताना यामधून अपेक्षित यश पालिकेला प्राप्त होताना दिसत नाही.महापालिकेच्या दहापैकी नऊ शाळांना इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशन (आयएसओ) मानांकन प्राप्त आहेत. अशा परिस्थितीत शाळांचे दर्जा कायम ठेवणे गरजेचे असते. या मानांकनासाठी एकूण ४४ निकष शाळांना पूर्ण करावे लागतात. यामध्ये शाळेतील विद्यार्थ्यांचा ड्रेस कोड, स्वच्छता, प्रथमोपचार पेटी, साहित्य मांडणी, ई-लर्निंग, स्टेशनरी, नावीन्यपूर्ण उपक्रम आदीसह गुणवत्ता ध्येय, राष्ट्रीय नेते फलक, प्रयोगशाळा, वाचनालय आदीसह विविध बाबींचा समावेश असतो.मात्र, यंदाची पालिकेच्या शाळांची आयएसओ मानांकन प्रक्रियाही पालिकेला करता आली नसल्याने पालिकेचे आयएसओ मानांकनही रद्द झाल्याचे समजते.आयएसओ मानांकन रद्द होण्याची शक्यतामहापालिकेच्या दहापैकी नऊ शाळांना इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड आॅर्गनायझेशन (आयएसओ) मानांकन प्राप्त आहेत. अशा परिस्थितीत शाळांचे दर्जा कायम ठेवणे गरजेचे असते. मानांकनासाठी एकूण ४४ निकष या शाळांना पूर्ण करावे लागतात. मात्र, यंदा पालिकेच्या शाळांची आयएसओ मानांकन प्रक्रियाही शिक्षण विभागाला पूर्ण करता आली नसल्याने पालिकेचे आयएसओ मानांकनही रद्द होण्याची शक्यता आहे.महापालिकेच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, याकरिता महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. जिल्हा परिषदेच्या शाळांचा हस्तांतराचा विषयही अद्याप प्रलंबित आहे. या शाळा हस्तांतरित झाल्यावर वर्ग एकच्या अधिकाऱ्याच्या अखत्यारीत सर्व शाळा आल्यावर संपूर्ण पालिका क्षेत्रातील शाळांची गुणवत्ता उंचावेल.- संजय शिंदे,उपायुक्त, पनवेल महापालिका

टॅग्स :panvelपनवेलSchoolशाळाEducation Sectorशिक्षण क्षेत्र