कर्जत : कोकण ज्ञानपीठ कर्जत अभियांत्रिकी महाविद्यालयातील चौथ्या वर्षात शिकत असलेल्या एका विद्यार्थ्याचा क्रिकेट मैदानात मृत्यू झाला. शुक्रवार, २८ फे ब्रुवारी रोजी सकाळी १० ही घटना घडली.कर्जतमधील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या क्रीडा स्पर्धा सुरू आहेत. रणजीत पाल ( २१, रा. उल्हासनगर, कॅम्प नं. ५, ठाणे) हा इलेक्ट्रॉनिक्स- टेलिकम्युनिकेशन विभागात शेवटच्या वर्षात शिकणारा विद्यार्थी बॉक्स क्रिकेट खेळत होता. त्याची बॅटिंग झाल्यावर तो कोसळला. रणजीतला कर्जत उप जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉ. नितीन चव्हाण यांनी त्याला तपासणीनंतर मृत घोषित केले.
दुर्दैवी! कर्जतमध्ये क्रिकेट मैदानावर विद्यार्थ्याचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 03:12 IST