शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

रायगडला वादळाचा तडाखा, जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 07:09 IST

अलिबाग, नागोठणेत वीजपुरवठा खंडित

अलिबाग : परतीच्या पावसाबरोबर जोरदार वादळाच्या तडाख्यामुळे शुक्रवारी अलिबाग, कार्लेखिंड, पेण, नागोठणे परिसरात मोठे नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे. शुक्रवारी सायंकाळी ७ च्या सुमारास विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस सुरू झाला. कार्लेखिंड-रेवस विभागातील २२ तास वीजपुरवठा खंडित झाला. तर अलिबाग तालुक्यातील संपूर्ण वीजपुरवठा खंडित झाला. या वादळामुळे याचा फटका जास्त रेवस फिडरच्या लाइनला बसला आहे.

लघुदाब वाहिनी आणि उच्चदाब वाहिनीवरील विद्युत जनित्रयंत्रावर, इन्सुलेटरवर वीज कोसळून काही ठिकाणी तारा जंपर, तर पोल पडलेले आहेत. वादळामुळे विद्युत जनित्र यंत्र तुटून पडलेले आहेत. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्धपातळीवर काम चालू असून, त्यासाठी संपूर्ण दिवस लागणार आहे, असे मंडळाच्या अधिकृत सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे. वादळामुळे तयार झालेली भात शेती कणसाच्या वजनामुळे वाऱ्याबरोबर जमीनदोस्त झाली आहे, तर काही ठिकाणी सर्वच भातशेती पाण्याखाली केली आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. कार्लेखिंड-रेवस विभागात आंबा कलमाच्या बागा आहेत, त्या बागांमधील झाडे कोसळल्याने बागायतदारांची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे.या वादळामुळे परिसरातील वीजवाहिन्या, वीज खांबांचे नुकसान झाल्याने परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तडाख्याने अनेक ठिकाणच्या घरांवरील छपरे उडून गेली आहेत. वादळी पावसाने परिसरातील झाडे उन्मळून पडली. रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांच्या फांद्या तुटून अनेक ठिकाणी पडल्याने चालकांना वाहने चालवताना अडचणी येत आहेत. अनेक ठिकाणी सुरूच्या बागांचे नुकसान झाले.चिरनेरला घरावर वीज कोसळून सामान खाकच्विजेच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे शुक्र वारी चिरनेरमधील एक घर जळाले. घराला लागलेल्या आगीत सामानासह संपूर्ण घर खाक झाले. महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात एकूण १७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.च्शुक्र वारी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास या घरावर वीज पडली आणि घराला आग लागली. संजय पाटील यांच्या मालकीच्या या घरातील मंडळी साखरचौथ गणपतीच्या दर्शनासाठी गेली असल्यामुळे जीवितहानी झाली नाही. आगीत घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तू टीव्ही, फ्रीज, कपाट, कपाटातील दागिने, घरातील अन्नधान्य, भांडी आणि कागदपत्रे जळून खाक झाली.च्विजेची तीव्रता एवढी होती की, घरातील भांडी, पंखे आणि कपाट वितळून गेले. कपाटातील दागिने आणि रोख रक्कम एक लाख ५० हजारही जळाले. चिरनेरचे सरपंच संतोष चिर्लेकर, पोलीस पाटील संजय पाटील, तलाठी यांनी रात्री उशिरापर्यंत घराचा पंचनामा केला. या वेळी १७ लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगितले. शनिवार उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली आणि नैसर्गिक आपत्ती म्हणून या कुटुंबाला मदत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

टॅग्स :RaigadरायगडRainपाऊस