शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

अलिबाग पर्यटन महोत्सवाची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 02:58 IST

अलिबाग : अत्यंत उत्साहात साज-या झालेल्या अलिबाग नगरपरिषद व आरडीसीसी बँकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यटन महोत्सवाचा समारोप मंगळवारी संध्याकाळी अलिबागमधील स्थानिक कलाकारांच्या जल्लोषाने झाला.

अलिबाग : अत्यंत उत्साहात साज-या झालेल्या अलिबाग नगरपरिषद व आरडीसीसी बँकेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पर्यटन महोत्सवाचा समारोप मंगळवारी संध्याकाळी अलिबागमधील स्थानिक कलाकारांच्या जल्लोषाने झाला. अलिबागचा गुणी कलाकार अमोल कापसे यांच्या नृत्याने प्रारंभ झालेल्या या समारोप सोहळ्यात  विक्रांत वार्डे यांची गीते, किरण साष्टे यांचे निवेदन, नटराज डान्स अ‍ॅकॅडमीचे उमेश कोळी, रिदम आर्ट इन्स्टिट्यूूटच्या कलाकारांनी सर्व शिक्षाअभियानातून दिलेला संदेश असे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारे कलाविष्कार रंगमंचावर साकारले.या वेळी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अदिती तटकरे, उपाध्यक्ष अ‍ॅड. आस्वाद पाटील, नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा परिषद सदस्य भावना पाटील, चित्रा पाटील, आरसीएफचे कार्यकारी संचालक एस. के. जावळे, डॉ. ज्योती लाटकर, माजी नगराध्यक्षा सुनीता नाईक, आरडीसीसी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा नगरसेवक प्रदीप नाईक, उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, नगरसेविका सुरक्षा शहा, जगदिश एंटरप्राइजचे दर्शन शहा, सभापती वृषाली ठोसर, पंचायत समिती सदस्य रचना म्हात्रे, नगरसेवक अ‍ॅड. गौतम पाटील, अजय झुंजारराव, सुषमा पाटील, अश्विनी पाटील, महेश शिंदे, राकेश चौलकर, उमेश पवार, प्रिया वेलकर, अनिल चोपडा, विनोद सुर्वे, संजना किर, नईमा सय्यद आदी उपस्थित होते.आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे हॉटेल व्यावसायिक रमाकांत शिंदे, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे राकेश वारीसे, सिंगापूरच्या धर्तीवर पर्यटन महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरलेल्या प्रतिमेचे शिल्पकार संजय सारंग, वाळूशिल्पकार मितेश पाटील, वकिली क्षेत्रातील अ‍ॅड. बाळासाहेब पारकर, कार्यकर्ते संदीप गोठवडीकर, वैद्यकीय सेवा क्षेत्रातील डॉ. एस. एन. तिवारी, क्र ीडा क्षेत्रात यतिराज पाटील, सहकारी क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते गिरीश तुळपुळे, अंत्यविधी करिता सामाजिक भावनेतून आपल्या टेंपोसह सक्रिय कार्यरत विश्वास खोत, रायगड जिल्हा रुग्णालयातील डायलेसिस युनिट सेवा देणाºया डॉ. दीपाली देशमुख, महिला उद्योजिका रत्नांजली पेरेकर, अल्पवयात न्यायाधीश पदापर्यंत पोहोचलेल्या अ‍ॅड. कीर्ती काटकर यांना विशेष पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करून गौरविण्यात आले.>विद्यार्थिनी आणि महिला यांना छेडछाड वा आपत्कालीन परिस्थितीत पोलीस दामिनी पथक आणि बिटमार्शल यांचे साहाय्य तत्काळ उपलब्ध होण्याकरिता या दोन्ही सेवांचे फोन विद्यार्थिनी व महिलांना उपलब्ध करून देण्याकरिता ‘लोकमत’, अलिबाग नगरपरिषद आणि रायगड पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने हाती घेण्यात आला आहे. ‘विद्यार्थिनी-महिला छेडछाड प्रतिबंधक’उपक्रमाचा शुभारंभ या वेळी रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या हस्ते करण्यात आला.