शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
6
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
7
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
8
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
9
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
10
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
11
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
12
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
13
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
14
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
16
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
17
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
18
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
19
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
20
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ

इंधन दरवाढीच्या किमतीने घेतला पेट; आर्थिक झळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2021 23:26 IST

सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले; दैनंदिन वापराच्या वस्तू महागल्या

लोकमत न्यूज नेटवर्क रायगड : काहीच दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. सर्वसामान्य नागरिक आणि नाेकदारांना त्यामधून विशेष दिलासा मिळालेला नाही. त्यातच पेट्राेल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या किमतीने पेट घेतल्याने त्यांच्या आर्थिक झळा सर्वसामान्यांच्या बजेटला बसत आहेत. सरकारने पेट्राेल, डिझेल आणि घरगुती गॅस सिलिंडरच्या दराने गेल्या चार महिन्यापासून चांगलीच उसळी घेतली आहे. पेट्राेल-डिझेलच्या वाढत्या दरामुळे दैनंदिन वापरायच्या वस्तू चांगल्यात महागल्या आहेत. किराणा वस्तू, भाज्यांचे दर वाढत असल्याने जगायचे कसे असा प्रश्न पडला आहे. आमदनी अठन्नी खर्चा रुपया अशी परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. वाढणाऱ्या महागाईमुळे गरीब, मध्यमवर्गीयांचे हाल हाेत आहेत. नाेव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास सिलिंडरचे दर अनुक्रमे ६०५, ६५५, ७०५ आणि ७३० रुपये असल्याचे दिसते. नाेव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंत तब्बल १२५ रुपयांची वाढ झाल्याचे स्पष्ट हाेते.पेट्राेलचे दर हे नाेव्हेंबर ८७.९४ रुपये प्रतिलीटर, डिसेंबर ८९.१७ रुपये प्रतिलीटर, जानेवारी ९०.४९ रुपये प्रतिलीटर आणि फेब्रुवारी ९३.०१ रुपये प्रतिलीटर त्याचप्रमाणे डिझेलचे दर हे नाेव्हेंबर ७५.८७ रुपये प्रतिलीटर, डिसेंबर ७७.९१ रुपये प्रतिलीटर, जानेवारी ७९.४२ रुपये प्रतिलीटरआणि फेब्रुवारीमध्ये डिझेल प्रतिलीटर ८२.१६ रुपये झाले आहे. पेट्राेलच्या दरात पाच रुपये, तर डिझेलच्या दरात सहा रुपये २९ पैशांनी वाढ झाली आहे.पेट्राेल, डिझेलसह सिलिंडरचेही दर चांगलेच वाढले आहेत. याच माेदी सरकारमधील आताचे मंत्री दरवाढीविराेधात आधीच्या सरकार विराेधात रान उठवले हाेते. किमती वाढल्याने किराणामाल, भाजीपाला यांचे दरही गगनाला भिडले आहेत. त्यामुळे त्यांचे धाेरण दुटप्पी आहे.- दत्ता ढवळेसरकारने अर्थसंकल्प सादर केला खरा मात्र सीतारमन यांच्या पाेतडीतून सर्वसामान्यांसाठी काहीच निघाले नाही. उलट या सरकराने इंधनावर अधिभार लावण्याचे ठरवले आहे. म्हणजे आता पेट्राेल, डिझेल आणि गॅस सिलिंडरच्या दरामध्ये आणखीन वाढ हाेणार आहे. याचाच अर्थ महागाई अजून वर डाेके काढणार.- दीपक म्हात्रेसरकारने इंधनाच्या किमतीमध्ये भरमसाठ वाढ केली आहे. त्यामुळे आपाेआपच सर्वच महागणार आहे. किराणा, भाजीपाला यांचेही दर वाढणार आहेत. त्यामुळे किचन बजेटवर त्याचा विपरीत परिणाम हाेणार आहे. सरकारने किमती कमी करू, असे आश्वासन दिले हाेते. मात्र सरकार आता ते आश्वासन पाळताना दिसत नाही.- नेहा पाटील

टॅग्स :Petrolपेट्रोलDieselडिझेल