शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

काशिद येथे गाडीने घेतला पेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 23:30 IST

पुणे येथून संदीप निकम (३९) हे कुटुंबासह ओमनी व्हॅनने काशिद येथे येत असताना गाडीतून धूर येऊन गाडीने पेट घेतला.

आगरदांडा : पुणे येथून संदीप निकम (३९) हे कुटुंबासह ओमनी व्हॅनने काशिद येथे येत असताना गाडीतून धूर येऊन गाडीने पेट घेतला. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही.संदीप निकम हे गाडी क्रमांक एम एच १४ ए एम ६१४९ ने पत्नी सुरेखा निकम, भाऊ युवराज निकम, आदित्य साळुंके, आकाश साळुंके असे पाच जण मुरुड तालुक्यात फिरण्यासाठी आले होते. या गाडीमध्ये सीएनजी किट बसविले होते. दुपारी बोर्ली येथे जेवण करून ते काशिदकडे जात असताना त्यांची गाडी ही काशिद खिंडीत आली असता गाडीतून अचानक धूर येऊ लागल्याने चालक संदीप निकम यांच्यासहित गाडीत असणारे सर्वजण घाबरून गाडीबाहेर पडले. त्यानंतर काही वेळातच गाडीने पेट घेतला. त्यात पूर्णत: गाडी जळून खाक झाली. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.>दासगावमध्ये कारचा टायर फुटल्याने अपघातबिरवाडी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील दासगाव गावच्या हद्दीत कारचा टायर फुटून झालेल्या अपघातात प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. महाड शहर पोलीस ठाणे हद्दीत २६ मे रोजी दुपारी ४.२० वाजण्याच्या सुमारास कार क्र.एमएच ०८ झेड २९३२ ही मुंबई -गोवा महामार्गावरून रत्नागिरी बाजूकडून मुंबईकडे चालवीत घेवून जात असताना दासगाव गावच्या हद्दीत आल्यावर गाडीच्या समोरील उजव्या बाजूचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला. यामुळे गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर जावून आदळली. या अपघातात राजेश्री संदीप सहस्त्रबुद्धे (५२), सुमित संदीप सहस्त्रबुद्धे (२५), सौरभ संदीप सहस्त्रबुद्धे (२१) सर्व रा.ठाणे, मूळ रा.साखळकोंड ता.संगमेश्वर जि.रत्नागिरी, सेफाली शिरीष घाग (५३,रा.ठाणे) हे जखमी झाले असून महाडमधील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. याबाबत महाड शहर पोलीस ठाण्यात मोटार अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पो.ह. एन.पी.तिडके हे करीत आहेत.