शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

रायगडसाठी सरकारने उघडली तिजोरी; आणखी ३०१ कोटी मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 00:28 IST

; मदतीचा आकडा पोहोचला ३७३ कोटी रुपयांवर

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी सरकारने आणखीन ३०१ कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली असल्याची माहिती रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी येथे दिली. जिल्ह्यात निसर्ग चक्रीवादळामुळे झालेले नुकसान आणि त्या अनुषंगाने प्रशासन करत असलेल्या कार्यवाहीचा आढाव पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी अलिबाग येथे घेतला. त्यानंतर, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेते त्या बोलत होत्या.आतापर्यंत ७२ कोटी रुपयांचे अनुदान जिल्ह्याला प्राप्त झाले आहे. मदत वाटपाचे काम सुरू आहे. जिल्ह्यात झालेले नुकसान लक्षात घेऊन, राज्य सरकारने आणखी ३०१ कोटी रुपयांची वाढीव आर्थिक मदत रायगडला देऊ केली आहे. यापैकी २४२ कोटी रुपयांची मदत ही पडघड झालेल्या घरांच्या उभारणीसाठी आहे. आतापर्यंत प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यांनुसार घरांचे ३९५ कोटी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले. अजूनही पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा सुमारे ७०० कोटी रुपयांच्या घरात जाण्याचा अंदाज आहे, असेही तटकरे यांनी सांगितले.दरम्यान, ३०१ कोटी जिल्हा प्रशासनाकडे जमा झाल्यानंतर पुढील आठ ते पंधरा दिवसांत ही मदत नुकसानग्रस्तांच्या खात्यांमध्ये जमा होईल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी दिला आहे.याप्रसंगी जिल्हाधिकारी निधी चौधरी, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप हळदे, अपर जिल्हाधिकारी डॉ.भरत शितोळे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यावर खासदार नाराजपत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच खासदार सुनील तटकरे यांनी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्यावर नाराजी प्रकट केली. काही ठिकाणी वीज, इंटरनेट नसल्याने राष्ट्रीयकृत बँका आपत्तीची मदत लाभार्थ्यांना देत नाहीत. लाभार्थी सरकारच्या मदतीपासून वंचित राहत आहेत, हे योग्य नाही. आपण तातडीने बँकेच्या व्यवस्थापनाला सूचना करा, असे निर्देश खासदार तटकरे यांनी दिले.भूमिगत वीजवाहिनीचे काम सुरूराष्ट्रीय आपत्ती धोके निवारण योजनेंतर्गत अलिबाग शहरामध्ये ८९ कोटी रुपयांच्या भूमिगत वीजवाहिनीच्या कामांना सुरुवात झालेली आहे. त्याचप्रमाणे कोस्टल विभागातील उरण, मुरुड आणि श्रीवर्धन या शहरांमध्येही लवकरच भूमिगत वीजवाहिनी टाकण्याच्या कामासाठी सरकारकडून मंजुरी घेण्यात येईल.मच्छीमारांना मिळणार नुकसानभरपाईज्या मच्छीमारांच्या होड्यांचे नुकसान झाले आहे, त्यापैकी अंशत: नुकसानीसाठी पूर्वी चार हजार रुपये देण्यात येत होते. त्यात वाढ करून अंशत: नुकसानीसाठी १० हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे, तर ज्या होड्यांचे पूर्णत: नुकसान झाले आहे, त्यांना २५ हजार रुपयांची मदत दिली जाणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.नारळ, सुपारी, कोकम यांचा नुकसानीच्या यादीत सामावेशनारळ, सुपारी आणि कोकम या पिकांचा नुकसानीमध्ये समावेश करण्यात आला नव्हता.त्यामुळे आता नव्याने या पिकांचा समावेश नुकसानीच्या यादीत करण्यात आला असल्याने बागायतदार शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.नुकसानीची नोंदणी करताना जुन्या निकषानुसार रोजगार हमी योजना लागू करण्याची मागणी नागरिकांनी व्यक्त केली होती.त्यानुसार, सरकारकडे मागणी केली आहे, तसेच कोकणामध्ये बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठाने किमान तीन गावे दत्तक घ्यावीत, अशी मागणीही करण्यात आली असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.खासगी शाळांना मिळणार मदतसरकारी शाळांबरोबरच खासगी शाळांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारी शाळांना ज्या निकषानुसार नुकसानभरपाई देण्यात येईल, तेच निकष खासगी शाळांसाठी राहणार आहेत.गणपती कारखानदारांनाही निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे. त्यामुळे त्यांनाही नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याचे तटकरे यांनी सांगितले. जिल्ह्यातील आदिवासी वाड्यांमधील घरांचे मोठ्या संख्येने नुकसान झाले आहे.आदिवासी बांधवांनी स्वत:च तात्पुरती घरांची डागडुजी केली आहे. त्यामुळे प्रशासन पंचनामे करण्यासाठी तेथे गेल्यावर नुकसानीचे फोटो मागत आहेत. मात्र, तांत्रिक निकषात पंचनामे अडकवू नका, असे आदेश त्यांनी जिल्हा प्रशासनाला तटकरे यांनी दिले.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ