शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

गणेशभक्तांच्या एसटीची कंटेनरला धडक, एक ठार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2023 06:41 IST

डोंबिवलीहून कोकणात निघालेल्या बसला माणगावजवळ अपघात

माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर मौजे रेपोली गावाच्या हद्दीत रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास एसटीने कंटेनरला मागून धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात एका गणेशभक्ताचा मृत्यू झाला असून, त्याची पत्नी व मुलगादेखील गंभीर जखमी झाले आहेत. ही एसटी बस डोंबिवलीहून लांजाकडे जात होती.

बेदरकारपणे कंटेनरचालकाने कंटेनर उजव्या लेनवरून डाव्या बाजूच्या लेनवर घेतल्याने पाठीमागून येणाऱ्या एसटीची ठोकर लागून अपघात घडला. याबाबतची तक्रार चालक युवराज बाबूराव बनसोडे (रा. कानडी, जि. बीड) यांनी दाखल केली आहे. या अपघातात विनोद पांडुरंग तारले (३८, मूळ रा. राजापूर) यांचा मृत्यू झाला असून, त्याची पत्नी वैष्णवी तारले (३६) व मुलगा अथर्व तारले (१५) हे गंभीर जखमी झाले असून, त्यांना एमजीएम रुग्णालय दाखल केले आहे. या एसटी बसमध्ये एकूण ३५ प्रवासी प्रवास करीत होते. यातील एक प्रवासी विनोद तारले यांचा मृत्यू झाला.  यातील ३२ जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींवर उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे उपचार करण्यात आले. 

अपघाताचे वृत्त समजताच स्थानिक पोलिस स्टेशन गोरेगाव, महामार्ग वाहतूक पोलिस व स्थानिक लोकांनी अपघातग्रस्त प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली. तसेच वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून पोलिस प्रशासनाने एक लेन चालू केली. तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करून थोड्या वेळातच दोन्ही लेन चालू केल्या.

लांजाला निघाले होते तारले कुटुंबखासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून गणपतीसाठी जाणाऱ्या प्रवाशांसाठी शनिवारी डोंबिवलीतून बसेस सोडल्या होत्या. विनोद हे कुटुंबासह डोंबिवली पश्चिमेतील सरोवरनगरमधील चाळीत राहत होते. गणपतीसाठी कोकणातील लांजा या त्यांच्या गावी ते कुटुंबासह जात होते. शनिवारी रात्री डोंबिवलीतील रेल्वे ग्राउंड येथून राजापूरकडे सुटलेल्या बसमधून प्रवास करीत असताना माणगावजवळ हा अपघात झाला. बस चालकाच्या बाजूला बसलेले विनोद यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच, डोंबिवलीहून शिवसेनेचे अनेक पदाधिकारी माणगावला रवाना झाले. त्यांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी लांजा या त्यांच्या गावी नेण्यात आला आहे. 

टॅग्स :Accidentअपघात