शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

एसटी चालक झिंगाट, वाहकाच्या हाती स्टेअरिंग; प्रवाशी आणले सुखरूप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 11:29 IST

प्रसंगावधान राखत प्रवाशांना आणले सुखरूप

अलिबाग : एसटी बसचालक यांच्या हातात बसमधील पन्नासहून अधिक प्रवाशांच्या जीवाचे भवितव्य असते. असे असतानाही श्रीवर्धन आगारातून श्रीवर्धन ते मुंबई ही बस घेऊन जाणाऱ्या आबाजी धडस या चालकाने कर्तव्यावर असतानाही प्रवाशांच्या जीवाची पर्वा न करता मद्यपान केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुदैवाने वाहक अभय कासार याने प्रसंगावधान राखून प्रवाशांना सुखरूप रामवाडीपर्यंत आणले. ही घटना शुक्रवारी घडली. 

गणेशोत्सव सणाला आलेले चाकरमानी हे परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. शुक्रवारी, २२ सप्टेंबर रोजी श्रीवर्धन आगारातून साडेचार वाजता बस प्रवाशांना घेऊन मुंबईकडे निघाली. श्रीवर्धन-मुंबई बसवर आबाजी धडस हे चालक तर अभय कासार हे वाहक होते. चालक धडस हे श्रीवर्धन आगारातून बस घेऊन निघाले. सहा-साडेसहापर्यंत बस माणगाव आगारात पोहोचली. त्यानंतर चालक धडस याची प्रवाशांची इच्छित स्थळी सुखरूप पोहोचविण्याची जबाबदारी असताना ती टाळून ते मद्य पिण्यास गेले. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला होता.

चालक निलंबित  वाहक अभय कासार यांना ही माहिती कळताच त्यांनी श्रीवर्धन आगरप्रमुखांशी संपर्क साधला.   संबंधित अधिकाऱ्यांनी एसटी बसमध्ये असलेला वाहक कम चालक असलेले कासार यांना चालकाला बाजूला करून बस सुखरूप नेण्यास सांगितले.   त्यानुसार वाहकांने माणगाव ते रामवाडी असा ६० किमी बस चालवून प्रवाशांना सुखरूप आणले.   रामवाडी येथे बस आल्यानंतर मद्यपी चालक आबाजी धडस याच्यावर पेण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   संबंधित चालकावर तत्काळ सेवेतून कारवाई करत निलंबित केली असल्याची माहिती आगर व्यवस्थापक मणियार यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगडpassengerप्रवासीBus Driverबसचालक