शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचालकाने दिली कारला धडक, मुंबई-गोवा महामार्गावर अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2020 01:44 IST

एसटीचालक हा दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, या चालकाकडून या हद्दीत दुसरा अपघात असल्याचे ही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

दासगाव : सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील वहूर गाव हद्दीत मुंबई-गोवा महामार्गावर निगडे-दापोली-बोरीवली या एसटीची एक कारला मागून जोरदार धडक बसली. या अपघातात कारचा चुराडा झाला, तर कारचालक आणि प्रवासी किरकोळ जखमी झाले. मात्र, एसटीचालक हा दारूच्या नशेत असल्याचे पोलिसांचे म्हणणे असून, या चालकाकडून या हद्दीत दुसरा अपघात असल्याचे ही पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास महाड तालुक्यातील वहूर गाव हद्दीत निगडे दापोली बोरीवली एसटी बस क्रमांक एमएच २०-बी एल ३६६० ची स्विफ्ट कार क्रमांक एमएच ०६ बी यू ८१३६ हिला मागून जोराची धडक बसली. यामुळे कार पुढे असलेल्या दुसऱ्या गाडीवर आदळली. त्यामुळे कारच्या मागच्या आणि पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये कारमधील अख्तर जमाल आणि युसूफ चौधरी दोघे (राहणार गोरेगाव, तालुका माणगाव) किरकोळ जखमी झाले.ही एसटी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास निगडे तालुका दापोली येथून सुटली होती, तर यामध्ये २५ प्रवासी प्रवास करत होते. अपघातानंतर एसटीचालक अप्पासाहेब गरजे (राहणार नगर जामखेड) यांनी त्या ठिकाणाहून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, महामार्ग वाहतूक पोलिसांनी महाड हद्दीत याला ताब्यात घेतले.वाहतुकीचा खोळंबाअपघातानंतर जवळपास एक तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता. अपघात ठिकाणी महामार्ग वाहतूक पोलीस शाखेचे जी.ए. भिल्लारे आणि जिल्हा वाहतूक शाखेचे नितेश कोंडाळकर यांनी घटनास्थळी धाव घेत, काही वेळेतच वाहतूक सुरळीत केली.

टॅग्स :AccidentअपघातRaigadरायगड