श्रीवर्धन-बोर्लीपंचतन रस्ता खचल्याने धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 12:59 AM2019-06-21T00:59:09+5:302019-06-21T00:59:19+5:30

अपघाताची शक्यता; दुरुस्तीची प्रवाशांकडून मागणी

Srivardhan-Borlepanchan road crash risks | श्रीवर्धन-बोर्लीपंचतन रस्ता खचल्याने धोका

श्रीवर्धन-बोर्लीपंचतन रस्ता खचल्याने धोका

Next

दिघी : श्रीवर्धन तालुक्याला पुणे, मुंबई इतर जिल्ह्याकडे जोडणारा मुख्य रहदारी असणारा रस्ता प्रवासाकरिता धोकादायक ठरत आहे. श्रीवर्धन - बोर्लीपंचतन मार्गावरील आदिवासीवाडीजवळ असलेल्या साकवावरील रस्ता खचला आहे. मात्र, नव्याने बनलेल्या रस्त्याच्या निकृष्ट कामाकडे सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने या खड्ड्यात अपघात होण्याची शक्यता आहे. याची त्वरित दखल घेण्याची मागणी होत आहे.

श्रीवर्धन-बोर्लीपंचतन हा सरळ मार्ग १७ कि. मी. अंतराचा आहे. आदिवासीवाडी जवळील रस्ता महिन्यांपूर्वी नव्याने बनला आहे. काही दिवस पडत असलेल्या पावसामुळे रस्ता खचला. त्यामुळे येथून वाहने चालवणे धोकादायक बनले आहे. या मार्गावर दररोज शेकडो वाहने प्रवास करत असतात. रस्ता खचलेल्या ठिकाणी कोणताही धोकादर्शक फलक लावलेला नाही. शिवाय खड्ड्यात भरावदेखील टाकला नाही. रोजच वर्दळ असल्याने तसेच उन्हाळ्यात पावसाळ्यात श्रीवर्धन तालुक्यात मोठ्या प्रमाणात पर्यटकांची ये-जा असते. त्यामुळे येथील खड्डे लक्षात न आल्यास जीवितहानी होण्याची शक्यता आहे. जोरदार पावसात हा रस्ता पूर्ण खचण्याची भीती आहे. रस्त्याला खोल खड्डा तयार झाला आहे. समोरून येणारी वाहने खड्ड्यात आदळून एकमेकांवर धडकू नअपघात होण्याची शक्यता नाकरता येत नाही. सध्या रस्त्यावरून भीतिदायक प्रवास करण्याची वेळ आली आहे. मात्र, संबंधित विभाग याकडे लक्ष देत नसल्याने अनर्थ घडू शकतो. यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना वाहनचालक संताप व्यक्त करताना दिसत आहेत.

या रस्त्याला दोन दिवसांत किरकोळ अपघात झाल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे खचलेल्या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे. रस्ता सरळ असल्याने कार्ले आदिवासीवाडी जवळचा खचलेला भाग लक्षात येत नाही, त्यामुळे येथे दुचाकी अथवा मोठ्या वाहनांचा अपघात होऊ शकतो. सार्वजनिक बांधकाम खात्याने खचलेल्या या भागात भराव टाकावा, अशी मागणी प्रवाशांकडून होत असल्याचे रिक्षाचालक प्रवीण वडके यांनी सांगितले. अधिक माहितीसाठी श्रीवर्धन येथील बोर्लीपंचतन बांधकाम विभागीय कनिष्ठ अभियंता एस. एम. शेट्टे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.

Web Title: Srivardhan-Borlepanchan road crash risks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.