शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
5
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
6
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
7
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
8
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
9
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
10
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
11
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
12
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
13
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
14
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
15
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
16
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
17
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
18
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
19
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
20
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई

कोंडगावच्या पोटनिवडणुकीत सोनल वाघ विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2019 01:43 IST

कोंडगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये पोटनिवडणूक घेण्यात येऊन शेकापच्या सोनल सुभाष वाघ यांनी सरळ लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनाली कृष्णा धामणे यांचा ५४ मतांनी पराभव करीत विजय मिळवला.

नागोठणे : विभागातील कोंडगाव ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये पोटनिवडणूक घेण्यात येऊन शेकापच्या सोनल सुभाष वाघ यांनी सरळ लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनाली कृष्णा धामणे यांचा ५४ मतांनी पराभव करीत विजय मिळवला. शेकापच्या प्रतिभा राजीवले यांचा जातीचा दाखला अवैध ठरविल्याने ही पोटनिवडणूक घेण्यात आली होती.जिल्ह्यात शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी असल्याचे सर्वश्रुत आहे. मात्र, हे दोन्ही पक्ष एकमेकांसमोर उभे असल्याचे स्पष्ट झाले होते व राष्ट्रवादीला सेनेने सहकार्य केले असल्याचे उघड झाले होते. ग्रामपंचायतीत शेकापची सत्ता आहे. कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीत शेकापने केलेल्या विकासकामांमुळेच विजय मिळाला असल्याचे सरपंच अनंत वाघ यांनी स्पष्ट केले.कळंब गटाची पोटनिवडणूक सीमा पेमारे बिनविरोधनेरळ : कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या कळंब गटाच्या रिक्त असलेल्या सदस्यपदाची पोटनिवडणूक सोमवारी बिनविरोध झाली. शेतकरी कामगार पक्षाने सर्व राजकीय पक्षांना दिवंगत सदस्य सुदाम पेमारे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले होते. दिवंगत सुदाम पेमारे यांच्या पत्नी सीमा सुदाम पेमारे यांचा एकमेव नामांकन अर्ज दाखल झाल्याने ही पोटनिवडणूक बिनविरोध झाली असून २४ जून रोजी बिनविरोध विजयी झाल्याबद्दल राज्य निवडणूक आयोगाचे पत्र निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली परदेशी यांच्या हस्ते देण्यात आले.२८ मे २०१८ रोजी कर्जत तालुक्यातील कळंब या जिल्हा परिषद गटातील सदस्य सुदाम पेमारे यांचे आजारपणामुळे निधन झाले होते. सुदाम पेमारे हे २०१६ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार म्हणून विजयी झाले होते. सव्वा वर्षे सदस्य म्हणून काम केल्यानंतर पेमारे यांचे निधन झाले आणि त्यानंतर कळंब जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक सहा महिन्यात होणे अपेक्षित होते. मात्र तब्बल वर्षानंतर कळंब या जिल्हा परिषद गटाची पोटनिवडणूक झाली.पोटनिवडणुकीत आघाडीचे प्रदीप म्हात्रे विजयीपेण : पेण पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीत झालेल्या मतदानाची मतमोजणी सोमवारी पेण प्रांत कार्यालयात होवून त्यामध्ये शेकाप, काँग्रेस, राष्टÑवादी आघाडीचे उमेदवार प्रदीप म्हात्रे हे चुरशीच्या लढतीत ७२ मतांनी विजयी झाले. प्रदीप म्हात्रे यांना ४ हजार ४०९ मते मिळाली तर शिवसेना भाजपचे उमेदवार प्रथमेश जांभळे यांना ४ हजार ३३७ मते मिळाली.या विजयामुळे भाजपचे पेण पंचायत समितीत चंचुप्रवेश करण्याचे मनसुबे धुळीला मिळाले असून संजय जांभळे यांना हा मोठा धक्का देण्यात आघाडीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी हा विजय खेचून आणल्याचे एकंदर निकालातील झालेल्या मतदानातून स्पष्ट झाले आहे.

टॅग्स :RaigadरायगडElectionनिवडणूक