शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
3
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
4
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
5
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
6
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
7
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
9
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
10
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
11
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
12
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
13
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
14
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
15
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
16
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
17
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
18
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
19
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
20
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा

वाळीत प्रथा हे सामाजिक प्रदूषण

By admin | Updated: September 11, 2015 01:17 IST

वाळीत प्रथा हे सामाजिक प्रदूषण आहे. यामुळे सामाजिक एकता नाहीशी होत आहे. सामाजिक स्वाथ्य बिघडवणाऱ्या या अनिष्ट प्रथेविरु ध्द सर्वांनी लोकशाही मार्गाने एल्गार पुकारला

अलिबाग : वाळीत प्रथा हे सामाजिक प्रदूषण आहे. यामुळे सामाजिक एकता नाहीशी होत आहे. सामाजिक स्वाथ्य बिघडवणाऱ्या या अनिष्ट प्रथेविरु ध्द सर्वांनी लोकशाही मार्गाने एल्गार पुकारला पाहिजे अशी अपेक्षा मानवी हक्क संरक्षण क्षेत्रात सक्रिय कार्यरत अ‍ॅड. असीम सरोदे यांनी केले. गुरुवारी अलिबाग प्रेस असोसिएशनर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘वाळीत प्रथा एक शाप ’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. पी. एन. पी. एज्युकेशन सोसायटी मुख्यालय सभागृहात आयोजित या कार्यक्र मास अ‍ॅड. दत्ता पाटील कॉलेज आॅफ लॉच्या उपप्राचार्या अ‍ॅड. नीलम हजारे, अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सरचिटणीस नितीनकुमार राऊत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अ‍ॅड.सरोदे म्हणाले, पैसा, राजकीय ताकद, दंड शक्ती आणि स्वत:चेच महत्व टिकवून राहावे असे वाटणाऱ्या लोकांनी जातपंचायती व गावकी वाढविल्या. जातपंचायत व गावकी या बदला घेण्याचे केंद्रच बनले आहे. अमानुषतेचा राक्षस जातपंचायती जोपासत आहेत.हा राक्षस लोकशाहीच्या मुळावर उठला आहे. हा भस्मासूर वेळीच गाडला पाहिजे, असे सांगितले.वाळीत प्रकरणात जे तक्र ारदार असतात त्यांची बाजू समजून घेणे गरजेचे आहे. पोलीस तसे करत नाहीत. वाळीत प्रकरणांची तक्र ार पोलीस दाखल करून घेत नाहीत. तक्र ार दाखल करताना पोलीस पुरावे मागतात. हे चुकीचे आहे. पोलिसांनी न्यायालयाची भूमिका स्वीकारु नये. त्यांनी तक्र ार दाखल करून घ्यावी. आपली तक्र ार खरी आहे हे तक्र ारदार न्यायालयात सिध्द करेल. ती त्याची जबाबदारी. तक्र ार दाखल करून घेणे व त्याची प्रत तक्र ारदाराला देणे ही पोलिसांची जबाबदारी असल्याचे अ‍ॅड.सरोदे यांनी स्पष्ट केले.संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक बहिष्काराची सर्वाधिक प्रकरणे रायगड जिल्ह्यात घडली आहेत. या जिल्ह्यातील अनेक कुटुंबे गावकीचा अन्याय सहन करत आहेत. जिल्ह्यातून सामाजिक बहिष्काराविरूध्द आवाज उठला आणि हा आवाज विधानसभेत पोहचला. आता या अनिष्ट प्रथेविरूध्द कायदा अस्तित्वात येणार आहे. या कायद्यामुळे जातपंचायती व गावकी यांना मूठमाती मिळेल ,असा विश्वास अ‍ॅड. सरोदे यांनी अखेरीस व्यक्त केला. यावेळी प्रकाश सोनवडेकर, रमेश कांबळे, हर्षद कशाळकर आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)अनिष्ट प्रथेविरूध्द कायदा - संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक बहिष्काराची सर्वाधिक प्रकरणे रायगड जिल्ह्यात घडली आहेत.या जिल्ह्यातील अनेक कुटुंबे गावकीचा अन्याय सहन करत आहेत. जिल्ह्यातून सामाजिक बहिष्काराविरूध्द आवाज उठला. आणि हा आवाज विधानसभेत पोहचला. आता या अनिष्ट प्रथेविरूध्द कायदा अस्तित्वात येणार आहे, असे प्रतिपादन अ‍ॅड. सरोदे यांनी केले.