शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधी लक्ष देईना, प्रशासन मनावर घेईना; सामाजिक कार्यकर्त्यानं स्वखर्चातून सुरू केलं रस्त्याचं काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 02:04 IST

विजय हजारे यांनी स्वखर्चाने सुरू केले काम

नेरळ : कर्जत शहरातील टेकडीवर असणाऱ्या कर्जत तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असून, या रस्त्यांची रुंदीदेखील कमी झाली आहे. याकडे लोकप्रतिनिधींसह बांधकाम विभागानेदेखील दुर्लक्ष केले आहे. कोणीही या रस्त्याकडे लक्ष देत नसल्याने नेरळ-कोल्हारे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी स्वतः स्वखर्चाने या रस्त्यांची साइडपट्टी आणि रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे.कर्जत येथील तहसील कार्यालयात दररोज हजारो नागरिक हे अनेक कामानिमित्त कर्जत तहसील कार्यालायत येत असतात. तसेच येथे जवळच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यालयदेखील आहे. येथेही अनेक नागरिक ये- जा करत असतात; परंतु हा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे. याकडे कोणीही लक्ष देत नाही. पावसाच्या पाण्याने या रस्त्याची धूप होऊन हा रस्ता दिवसेंदिवस अरुंद होत आहे. रस्ता चढ-उताराचा आणि वळणदार असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत धोक्याचे झाले आहे.त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करताना कोणताही अपघात होऊ नये, यासाठी नेरळ -कोल्हारे येथील सामाजिक कार्यकर्ते विजय हजारे यांनी शासनाला, आणि लोकप्रतिनिधींना लाजवेल असे काम हाती घेतल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. तसेच शासन यापुढे तरी कर्जत तहसील कार्यलयाकडे जाणारा रस्ता चांगल्या दर्जाचा करेल का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.लोकप्रतिनिधींचे होत आहे दुर्लक्षकर्जत येथील तहसील कार्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून तहसीलदार, बांधकाम विभागाचे अधिकारी, अनेक शासकीय अधिकारी ये-जा करत असतात, अनेक ग्रामपंचायतीचे सरपंच, कर्जत पंचायत समितीचे सभापती, आमदार, खासदार, मंत्री महोदयदेखील या मार्गाने प्रवास करतात. परंतु यांनाही या रस्त्याची झालेली दुरवस्था दिसत नाही, हे आश्चर्य.