शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्वाभिमान असेल तर शिंदे-पवारांनी सरकारमधून बाहेर पडावे, अमित शाह...”; संजय राऊतांची टीका
2
कैसन बा...ठीक बा...! एकनाथ शिंदेंनी साधला उत्तर भारतीयांशी संवाद; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
3
क्राइम पेट्रोल मनात बसले! रुग्णाने आजारी असूनही डॉक्टरांची घेतली धास्ती, पुढे जे झाले...
4
जमीन-दुकान विकून अमेरिका गाठली अन् बेड्या घालून भारतात परतले 'ते' तरुण! नेमकं काय झालं?
5
प्रेक्षकांवर ‘राजा’ फेकणाऱ्या नाकामुराचा गुकेशने केला टप्प्यात कार्यक्रम; पाहा Video...
6
'द फॅमिली मॅन' सीझन ३ 'या' तारखेला होणार प्रदर्शित; 'नोव्हेंबर'मध्ये थरार पाहण्यासाठी सज्ज व्हा!
7
Yogi Adityanath: आता यूपीतील लोकांना उपचारांसाठी दिल्लीला जाण्याची गरज नाही: योगी आदित्यनाथ 
8
Jaipur Bus Accident: कामगारांनी भरलेली बस हाय-टेन्शन लाईनच्या संपर्कात आली, १० जण गंभीर भाजले; दोघांचा मृत्यू
9
२०२५ मध्ये तिसऱ्यांदा डिविडेंड देणार 'ही' डिफेन्स कंपनी, एका शेअरवर ६ रुपयांचा फायदा; पटापट चेक करा डिटेल्स
10
लाडकी बहीण योजनेसाठी सरकार किती निधी देते? ‘इतके’ कोटी होतात खर्च, आकडा पाहून व्हाल अवाक्
11
तुम्ही देखील सोने-चांदी खरेदी करुन घरात ठेवलंय? CA नितीन कौशिक म्हणतात ही गुंतवणूक नाही तर...
12
राज्यातील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या निवडणुका पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण 
13
Suryakumar Yadav: श्रेयसच्या दुखापतीची बातमी मिळताच सूर्याचा फिजिओला फोन, आता कशी आहे त्याची तब्येत?
14
"पुन्हा मलाच...", तिसरी वेळ राष्ट्राध्यक्ष बनण्याची इच्छा; स्वतःचं कौतुक करत डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
15
प्रत्येक टनामागे १ रुपया...! 'वसंतदादा शुगर'ची चौकशी लागली; शरद पवार, अजितदादांशी संबंधीत संस्था कचाट्यात
16
"पुढच्या दीड वर्षात सिनेमा बंद होईल...", महेश मांजरेकरांनी केलं भाकीत; असं का म्हणाले?
17
समस्त ओला ईलेक्ट्रीक स्कूटर मालकांसाठी महत्वाची बातमी! तुमचे तुम्हीच स्पेअर पार्ट घ्या, मेकॅनिककडून दुरुस्त करा...
18
२५ देशामध्ये अफाट संपत्ती, मॉलचेही आहेत मालक; 'हे' आहेत UAE चे सर्वात श्रीमंत भारतीय, ५० हजार कोटींपेक्षा अधिक नेटवर्थ
19
मंदीच्या काळातही ‘या’ 8 क्षेत्रांत कर्मचारी कपातीचा धोका नाही, भविष्यात मोठी संधी; जाणून घ्या...
20
VIRAL : महिला प्रवासी रिक्षात विसरली इयरफोन; वस्तू परत करण्यासाठी रिक्षा चालकाने लढवली 'अशी' शक्कल! होतंय कौतुक

आरसीएफ शाळेच्या विद्यार्थ्यांना रजत पुरस्कार

By admin | Updated: September 14, 2015 23:35 IST

येथील आरसीएफ शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता मंडळ चमूला मुंबई येथे झालेल्या २९ व्या गुणवत्ता मंडळ विभागीय अधिवेशनात रजत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

अलिबाग : येथील आरसीएफ शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता मंडळ चमूला मुंबई येथे झालेल्या २९ व्या गुणवत्ता मंडळ विभागीय अधिवेशनात रजत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांच्या समस्यांबाबत त्यांनी केलेल्या प्रस्तुतीकरणासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. इयत्ता दहावीतील मिहीर देशमुख याच्या नेतृत्वाखालील या विद्यार्थी गुणवत्ता मंडळ चमूत मिताली देशमुख, पार्थ कवळे, आभा घारपुरे, आल्विन जेकब, श्रुती म्हात्रे, ओमकार हिरगुडे या विद्यार्थ्यांचा समावेश होता.गुणवत्ता मंडळ ही मूळ जपानी संकल्पना असून वस्तू आणि सेवांच्या गुणवत्तापूर्ण उत्पादनापासून ते ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याच्या प्रक्रि येत येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी तिचा प्रभावी वापर केला जातो. विशेषत: कारखान्यांच्या वेगवेगळ्या विभागात काम करणारे कर्मचारी छोटी छोटी गुणवत्ता मंडळे स्थापन करून संबंधित विभागातील समस्यांचे निराकरण करीत असतात. या गुणवत्ता मंडळांच्या वार्षिक अधिवेशनात समस्या निराकरणाचे प्रस्तुतीकरण करून विचारांचे आदानप्रदान करतात. आरसीएफ थळ कारखान्यात देखील गुणवत्ता मंडळ चळवळ प्रभावीरीत्या कार्यरत असून यापासून प्रेरणा घेऊन आरसीएफ शाळेतील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या निराकरणासाठी ‘दिल मांगे मोअर’ या नावाने एक गुणवत्ता मंडळ स्थापन केले होते. ‘विद्यार्थ्यांचे गुणवत्ता मंडळ’ या अभिनव कल्पनेस प्रोत्साहन मिळावे आणि त्यांचे मनोबल वाढावे यादृष्टीने आरसीएफ व्यवस्थापनाने पुढाकार घेऊन विध्यार्थ्यांच्या या गुणवत्ता मंडळास मुंबई विभागीय अधिवेशनात सहभागी होण्याकरिता पाठविले होते.मुंबई विभागीय अधिवेशनात सहभागी २३५ गुणवत्ता मंडळात शालेय विद्यार्थ्यांचे हे एकमेव प्रस्तुतीकरण असल्याने आयोजकांनी उद्घाटन समारंभातच प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांना प्रस्तुतीकरणाची संधी दिली. समारंभास उपस्थित कॅम्लिनचे व्यवस्थापकीय संचालक श्रीराम दांडेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात आरसीएफ शाळेतील विद्यार्थ्यांच्या या गुणवत्ता मंडळ संकल्पनेचे कौतुक करून शालेय विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नास दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल आरसीएफ व्यवस्थापनाबद्दल गौरवोद्गार काढले. यावेळी अखिल भारतीय गुणवत्ता मंडळ फोरमचे राष्ट्रीय अध्यक्ष दि. के. श्रीवास्तव, मुंबई विभागाचे अध्यक्ष के. बी. भारती आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)