शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीएच्या ११ मिलियन टन क्षमतेची ॲडिशनल लिक्वीड कार्गो जेट्टी जेएसडब्ल्यू कंपनीला हस्तांतरित करण्याच्या करारावर स्वाक्षऱ्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2024 19:03 IST

जेएनपीएची बंदरात ३०० मीटर लांबीच्या सध्याच्या एसबी -०२ व एसबी- ०३ या दोन्ही बर्थ बीपीसीएल, इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आलेल्या होत्या.

  मधुकर ठाकूर -

उरण : जेएनपीएने नव्याने उभारलेल्या ३१४ खर्चाच्या ॲडिशनल लिक्वीड कार्गो जेट्टी सर्वाधिक बोली लावलेल्या व यशस्वी ठरलेल्या जेएसडब्ल्यू इन्फ्रा स्ट्रक्चरल लिमिटेड कंपनीला पीपीपी तत्वावर देण्याच्या करारावर सोमवारी जेएनपीए अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी स्वाक्षऱ्या केल्या.    

जेएनपीएची बंदरात ३०० मीटर लांबीच्या सध्याच्या एसबी -०२ व एसबी- ०३ या दोन्ही बर्थ बीपीसीएल, इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेड कंपनीला चालविण्यासाठी देण्यात आलेल्या होत्या. या जुन्या जेट्टीच्या दोन्ही बाजूला बर्थिंगची सोय असल्याने दोन्ही बर्थवर पीओएल, एलपीजी,ईडीबल ऑईल,मोलॅशिस आणि इतर अनेक प्रकारच्या केमिकल जहाजांची वाहतूक केली जात आहे. वाढत्या तरल पदार्थांच्या हाताळणीसाठी सध्याचे लिक्विड बल्क टर्मिनल अपुरे पडत असल्याने जहाजांसाठी प्रतिक्षा करावी लागते. त्यामुळे आयात व्यापाऱ्यांना नाहक अतिरिक्त वेळ, पैसा खर्च करावा लागतो.त्यामुळे आर्थिक नुकसान होते. जुन्या जेटीच्या दोन्ही बाजूला २५००० ते ७०००० डीडब्ल्युटी  ( डेडवेट टनेज) क्षमतेपर्यतची जहाजे एकाच वेळी हाताळण्याची सुविधा या जेट्टीला लागुन असलेल्या दुहेरी बर्थमध्ये आहे.जुन्या केमिकल जेट्टीची क्षमता ६.५ मिलियन टन  (एमटीपीए) इतकी आहे. 

लिक्वीड कार्गो जेट्टीला जोडूनच अतिरिक्त  आणखी जेट्टी  ४६५ मीटर पर्यंत वाढवण्यात आली आहे.त्यामुळे ॲडिशनल लिक्वीड कार्गो जेट्टीमुळे केमिकल वाहतुकीची क्षमता आणखी ४.५ मेट्रिक टनांपर्यंत म्हणजेच ११ मिलियन टनांपर्यंत  (एमटीपीए) म्हणजे दुपटीने वाढली आहे.त्यासाठी ३१४ कोटी रुपये खर्चही करण्यात आले आहेत.ही  ॲडिशनल लिक्वीड कार्गो जेट्टी पीपीपी तत्वावर चालविण्यासाठी जेएनपीएने निविदा काढल्या होत्या. या निविदा प्रक्रियेत सात कंपन्या सहभागी झाल्या होत्या.यामध्ये अव्वल बोलीदार म्हणून जेसडब्यू या कंपनीची निवड करण्यात आली आहे. या कंपनीने प्रति मेट्रिक टनासाठी २५२ रुपये रॉयल्टीची देण्याची ऑफर केली आहे.    

यशस्वी ठरलेल्या जेएसडब्ल्यू इन्फ्रा स्ट्रक्चरल लिमिटेड कंपनीला पीपीपी तत्वावर हस्तांतरित करण्याच्या करारावर सोमवारी जेएनपीए अध्यक्ष उन्मेष वाघ यांच्या हस्ते स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. “ लिक्विड कार्गो हँडलिंग क्षमतेचा विस्तार करण्याची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि बंदराची कार्यक्षमता वाढविण्यासाठी हे एक धोरणात्मक पाऊल आहे. नाविन्यपूर्ण भागीदारी आणि गुंतवणुकीद्वारे, आम्ही उत्कृष्ट सेवा देण्यासाठी आणि या प्रदेशात आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सज्ज असल्याचे जनेपीएचे अध्यक्ष उन्मेष वाघ यांनी   यावेळी सांगितले. 

टॅग्स :Raigadरायगड