शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 14:23 IST

श्रीवर्धन नगरपालिकेत जनतेने नगराध्यक्षपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला पसंती दिली. परंतु याठिकाणी जिंकून आलेले उमेदवार नगराध्यक्ष अतुल चौगुले हे शिंदेसेनेत जाणार असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

रायगड - नगरपरिषद आणि नगरपालिका निवडणुकीचे निकाल आज घोषित झाले आहे. त्यात श्रीवर्धन नगरपालिकेत उद्धवसेनेचे अतुल चौगुले नगराध्यक्ष म्हणून विजयी झाले आहेत. श्रीवर्धन नगरपालिकेवर गेली अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मात्र यावेळी श्रीवर्धन नगरपालिकेतील चित्र बदलले आहे. या निवडणुकीत विजयी झालेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार अतुल चौगुले मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेत प्रवेश करणार आहे. त्यामुळे निकालानंतर लगेच शिंदेसेनेने उद्धवसेनेला धक्का दिला.

श्रीवर्धन नगरपालिकेत जनतेने नगराध्यक्षपदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेला पसंती दिली. परंतु याठिकाणी जिंकून आलेले उमेदवार नगराध्यक्ष अतुल चौगुले हे शिंदेसेनेत जाणार असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. श्रीवर्धन नगरपालिकेतील राजकीय समीकरणे पाहता अतुल चौगुले यांनी विकासाच्या दृष्टीने सत्ताधारी पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जाते. निकाल लागल्यानंतर काही तास उरकत नाही तोवर अतुल चौगुले यांच्या या निर्णयाने अनेकांना धक्का बसला आहे. रायगड जिल्ह्यात महायुतीच्या नेत्यांमध्येच संघर्ष असल्याचे निवडणुकीत दिसून आले. याठिकाणी भरत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यात सामना होता. 

श्रीवर्धन हा सुनील तटकरेंचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र याठिकाणी नगराध्यक्षपदी ठाकरेंच्या सेनेचे उमेदवार निवडून आल्याने इथल्या मंत्री आदिती तटकरे यांच्यासाठी हा धक्का होता. परंतु आता इथले समीकरण बदलले आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे अतुल चौगुले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार जितेंद्र सातनाक यांचा पराभव केला आहे. या विजयानंतर ठाकरे गटाचे विजयी नगराध्यक्ष अतुल चौगुले यांनी भरत गोगावलेंसह सर्व पक्षाला श्रेय दिले आहे. अतुल चौगुले म्हणाले की, शिवसेनेत अंतर्गत काही नसते. शिवसैनिक एकच असतो. मग तो उद्धव ठाकरेंचा असो वा एकनाथ शिंदेंचा..शिवसैनिक रोखठोक असतो. माझ्या विजयात भरत गोगावले यांचाही सिंहाचा वाटा आहे.हा विजय दोन्ही शिवसेनेच्या जमिनीवरील कार्यकर्त्यांचा आहे. ही लढाई जनशक्ती विरुद्ध धनशक्तीची होती. पैशाचा महापूर आला होता. जनतेने पैशाला जुमावले नाही. १३ हजार जनतेचा मी ऋणी आहे.  माझ्या विजयात दोन्ही शिवसेना, मनसे, शेकाप यांच्यासह अनेकांचा सहभाग होता. पक्षप्रवेशाबाबत काही बोलणी नाही. कुठल्याही अपेक्षेने गोगावले यांनी मदत केली नाही असं सांगत भविष्यात पक्षप्रवेश ठरवू असं म्हटलं.

दरम्यान, आमच्या शिवसेनेने पूर्ण ताकदीशी अतुलला जी मदत केली ती तो विसरू शकत नाही. पक्षप्रवेशाबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार. आम्ही गनिमी काव्याने जे युद्ध केले त्यात आमचा विजय झाला आहे. ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केले त्यांचा हा विजय आहे अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे. 

उद्धवसेनेने दिला नकार, निव्वळ अफवा असल्याचा दावा

खासदार फुटणार, आमदार फुटणार, नगराध्यक्ष फुटणार अशा अफवा पसरवणे शिंदे गटाचे काम आहे. अतुल चौगुले यांना विजयी होऊन अर्धा तासही उलटला नाही, तोच ते शिंदेसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले. माझे अतुल चौगुलेंशी बोलणे झाले आहे, असं होत नाही आणि होणारही नाही, असे अंबादास दानवे म्हणाले आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Twist: Thackeray Faction's Victorious President to Join Shinde Camp?

Web Summary : In Raigad, Uddhav Sena's Atul Chaugule won as Shrivardhan's president, but may join Shinde's Sena with Minister Gogawale's support. Despite voters preferring Thackeray's party, Chaugule's potential switch stuns many, citing development reasons. Gogawale hinted at senior-level talks regarding Chaugule's entry.
टॅग्स :Local Body Electionमहाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक निकाल २०२५Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Maharashtra Election Resultsमहाराष्ट्र निवडणूक निकाल २०२५