शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! कर्जतमध्ये रस्त्याअभावी महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2017 02:37 IST

नेरळ : कर्जत तालुक्यातील बीड बु. ग्रामपंचायत हद्दीतील खाणींची वाडी या आदिम आदिवासी कातकरी समाजाच्या वाडीतील विवाहित महिला पिंकी मंगेश वाघमारे (२२) हिची तब्येत अचानक खालावली.

नेरळ : कर्जत तालुक्यातील बीड बु. ग्रामपंचायत हद्दीतील खाणींची वाडी या आदिम आदिवासी कातकरी समाजाच्या वाडीतील विवाहित महिला पिंकी मंगेश वाघमारे (२२) हिची तब्येत अचानक खालावली. तिला रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याने तातडीने रु ग्णालयात नेणे गरजेचे होते. मात्र खाणींची वाडी ते बीड वाहन जाण्यासाठी रस्ता नसल्याने या महिलेला चादरींची झोळी करून काही अंतर चालत न्यावे लागले. परिणामी त्वरित उपचार न मिळाल्याने या महिलेचा मृत्यू झाला.येथील ग्रामस्थ मागील दहा-बारा वर्षांपासून बीड बु. ग्रुपग्रामपंचायतीच्या प्रत्येक ग्रामसभेत वाडीत ये-जा करण्यासाठी गाडीचा रस्ता करून देण्याचा ठराव मांडत आहेत, मात्र लोकप्रतिनिधी व ग्रामसेवक या ठरावाला फारसे महत्त्व देत नाहीत. याच वाडीतील माजी सदस्या व सरपंच सुनीता वाघमारे यांनी वेळोवेळी मासिक सभेत व ग्रामसभेत ठराव घेऊनही त्यावर कार्यवाही होत नसल्याचा आरोप ग्रामस्थांमधून होत आहे. या वाडीत पोहोचण्यासाठी रस्ता नसल्याने येथील आदिवासी खासगी जागेच्या मालकांच्या बांधावरून किंवा वन जमिनीतील याच रस्त्याने ये-जा करतात. शाळेत जाणारी लहान मुलेही याच बांधाच्या रस्त्याने बीड बुद्रुक गावातील शाळेत जातात.येथील आदिवासींनी वनहक्क कायदा २००६ चे कलम ३(२)अंतर्गत बीड हायस्कूल ते खाणींची वाडी हा २४०० चौ.मी. लांबीचा रस्ता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत तयार करण्याचा प्रस्ताव गटविकास अधिकारी कर्जत पंचायत समिती यांच्यामार्फत १0 फेब्रुवारीला कर्जत पूर्व वनाधिकारी यांच्याकडे दाखल करून आठ महिने उलटूनही रस्ता मंजूर केलेला नाही.

टॅग्स :Deathमृत्यूRaigadरायगड