शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! किल्ले रायगडावर सुरक्षेसाठी बसवलेले सीसीटीव्ही ५ वर्षांपासून बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 06:24 IST

येत्या १२ एप्रिल रोजी शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत.

अलिबाग : रायगड किल्ल्यांवर सुरक्षेच्या दृष्टीने बसविण्यात आलेले १५ सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या पाच वर्षापासून बंद आहेत. शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी १२ एप्रिल रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उपस्थित राहणार आहेत. यामुळे येथील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडाला दररोज शेकडो शिवभक्त, पर्यटक भेट देत असतात. या ऐतिहासिक स्थळी शिवराज्यभिषेक सोहळा, शिवपुण्यतिथी आदी मोठे कार्यक्रम होतात. येत्या १२ एप्रिल रोजी शिवाजी महाराज पुण्यतिथी कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येणार आहेत. त्यामुळे कार्यक्रमाचा आढावा मान्यवरांकडून घेण्यात आला असतानाच गडावरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याची माहिती उघड झाली आहे.

अमित शहा १२ एप्रिलला किल्ले रायगडावरछत्रपती शिवाजी महाराजांची १२ एप्रिल रोजी ३६५ वी पुण्यतिथी आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे गडावरील सुरक्षा व्यवस्थेचे काटेकोरपणे पालन करणे प्रशासन, शासनाचे कर्तव्य आहे. मात्र किल्ले रायगडावर सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. किल्ले रायगडावर सीसीटीव्ही बंद आहेत, याबाबत कल्पना नव्हती. मात्र पुरातत्त्व संशोधन विभागाला त्वरित सूचना देऊन हे कॅमेरे सुरू करण्याची सूचना करतो. - संभाजीराजे छत्रपती, माजी खासदार

पुरातत्त्व संशोधन विभागाकडून प्रतिसाद नाहीकिल्ले रायगडाची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी पुरातत्त्व संशोधन विभागाने सात-आठ वर्षांपूर्वी या गडाच्या परिसरात १५ सीसीटीव्ही बसविले आहेत. मात्र ते पाच वर्षांपासून बंद आहेत. बंद असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबाबत पुरातत्त्व संशोधन विभाग अधिकारी राजेश दिवेकर यांच्याशी संपर्क झाला नाही.

टॅग्स :FortगडRaigadरायगडAmit Shahअमित शाह