शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

रायगडावर राष्ट्रपतींचे हेलिकॉप्टर उत्तरवण्यास शिवप्रेमींचा विरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2021 19:50 IST

Raigad : रायगड किल्ल्यावरील होळीच्या माळावर हेलिपॅड उभारण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे.

महाड : देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे 6 डिसेंबर रोजी रायगडावर येत आहेत. राष्ट्रपती कोविंद हे हेलिकॉप्टरने येणार आहेत. मात्र हेलिकॉप्टर  रायगड किल्ल्यावर उतरण्यास शिवप्रेमींनी विरोध केला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

रायगड किल्ल्यावरील होळीच्या माळावर हेलिपॅड उभारण्याची तयारी प्रशासनाने सुरु केली आहे. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड असंतोष खदखदत आहे. राष्ट्रपती यांचे हेलिकॉप्टर रायगडावर उतरुन देऊ नका, अशी मागणी शिवप्रेमींनी केली आहे. अतिमहत्वाच्या व्यक्तींसाठी या ठिकाणी हेलिपॅड उभारण्यात आले होते. परंतू हेलिकॉप्टर उतरताना प्रंचड माती आणि धूळ ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर उडत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर शिवप्रेमींनी या विरोधात आंदोलन केले होते. 

1996 साली या ठिकाणचे हेलिपॅड काढून टाकण्यात आले होते. सुमारे २० वर्षांच्या कालावधीत कोणालाही या ठिकाणी हेलिकॉप्टरने येण्यास परवानगी देण्यात आली नाही. येत्या 6 डिसेंबरला देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे रायगडवर येत आहेत. यानिमित्त होळीच्या माळावर शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी हेलिपॅड उभारण्यात येत आहे. याला शिवप्रेमींनी विरोध केला आहे.

महाडमधील शिवप्रेमी सिद्देश पाटेकर यांनी सांगितले की राष्ट्रपतींच्या या दौऱ्याला आमचा विरोध नाही.  मात्र या ठिकाणी हेलिकॉप्टर उतरवताना आणि उड्डाण घेताना धूळ, माती महाराजांच्या पुतळ्यावर उडणार आहे. त्यामुळे तो एकप्रकारे महाराजांचा अवमान करण्यासारखेच आहे. त्यामुळे आमचा या ठिकाणी हेलिपॅड तयार करण्यास आणि हेलिकॉप्टर उतरवण्यास विरोध आहे.

टॅग्स :RaigadरायगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRamnath Kovindरामनाथ कोविंद