शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

पेब किल्ल्यावर थर्टी फर्स्टची पार्टी करणाऱ्या झिंगाट मद्यपींना शिवप्रेमींचा दणका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 10:20 IST

काही मद्यप्रेमींनी पेब किल्ल्याची ऐतिहासिक आणि धार्मिक मर्यादा पायदळी तुडवत मद्यपान आणि नशाखोरी करत आगावूपणा केला.

नेरळ/रायगड -   2019 ला निरोप देऊन नववर्ष 2020 चे संपूर्ण जगभरात उत्साहात स्वागत करण्यात आले. सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाच्या स्वागतासाठी अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. नेहमी संधीच्या शोधात असलेले मद्यपी आणि अन्य व्यसनी मंडळींनी थर्टी फर्स्टच्या निमित्ताने आपला घसा ओला करून घेतला. मात्र काही मद्यप्रेमींनी ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांच्या मर्यादा पायदळी तुडवत अशा ठिकाणी मद्यपान आणि नशाखोरी करत आगावूपणा केला. दरम्यान, नेरळजवळील पेब (विकटगड) किल्ल्यावर मद्यपान आणि नशाखोरी करणाऱ्या काही पर्यटकांना शिवप्रेमींनी दणका दिला आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी काही मुंबईतील काही हौशी मंडळींनी माथेरानजवळील पेब किल्ला गाठला होता. त्यांनी दारू आणि गांजासह नशेचे अन्य पदार्थ सोबत घेत पार्टीची जोरदार तयारी केली होती. मात्र त्यांची पार्टी ऐन रंगात आली असतानाच शिवप्रेमींनी त्यांना पकडले आणि या झिंगाट मंडळींची नशा उतरवली.त्यानंतर या मद्यप्रेमींना अर्धनग्न करत त्यांच्याकडून चूक कबूल करवून घेतली. तसेच शिवप्रेमींनी त्यांना केल्या प्रकाराबाबत माफी मागण्यास लावली. या सर्वप्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

 

टॅग्स :31st December party31 डिसेंबर पार्टीMatheranमाथेरानRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र