शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

Shivjayanti: शिवजयंतीनिमित्त रायगडावर डिस्को लायटिंग; अजित पवारांसह छत्रपती संभाजीराजेही संतापले

By प्रविण मरगळे | Updated: February 19, 2021 14:12 IST

Raigad Fort Lighting controversy News: शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे.

ठळक मुद्देरायगडावर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई केली, मात्र त्यावरून आता वाद होताना दिसत आहे,महाराजांचे विचार लक्षात घेतले पाहिजेत. रायगडावर डिजे लाईट लावणं अतिशय गंभीर आहेरंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे.

रायगड – शिवजयंतीच्या निमित्ताने स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्यावर पुरातत्व विभागाकडून डिस्को लायटिंग केल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे, खासदार छत्रपती संभाजीराजे(Chhatrapati Sambhaji Raje Bhosale) यांनी ट्विटरद्वारे ही नाराजी उघडपणे बोलून दाखवली असून उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनीही या प्रकरणावर भाष्य करत या प्रकाराला फटकारलं आहे. (Raigad Fort Lighting)

याबाबत अजित पवार म्हणाले की, काही उत्साही लोकांनी रायगडावर लायटिंग केली हा त्यांचा अजाणतेपणा असल्याचं दिसून येतो, पण महाराजांचा वारसा आहे तिथे असं घडणं चुकीचं आहे, काही उत्साही लोक नको त्या गोष्टी करत असतात, या गोष्टी थांबल्या पाहिजेत आणि त्यातलं पावित्र्य जपलं पाहिजे. महाराजांचे विचार लक्षात घेतले पाहिजेत. रायगडावर डिजे लाईट लावणं अतिशय गंभीर आहे अशा शब्दात त्यांनी फटकारलं आहे.

शिवसेनेचे कल्याण येथील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे(Shivsena Dr. Shrikant Shinde) यांनी पुरातत्व विभागाची परवानगी घेऊन रायगडावर शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला विद्युत रोषणाई केली, मात्र त्यावरून आता वाद होताना दिसत आहे, खासदार छत्रपती संभाजीराजे यांनीही या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. संभाजीराजेंनी ट्विटमध्ये म्हटलंय की, भारतीय पुरातत्त्व विभागाने १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती निमित्ताने रायगड किल्ल्यावर जी प्रकाशयोजना केली आहे, ती अतिशय विचित्र स्वरूपाची आणि महान वारशाचा अपमान करणारी आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या इतिहासात आजचा दिवस काळा दिवस म्हणून गणला जाईल असं त्यांनी म्हटलं आहे.

तसेच त्यांचे अधिकारी महान ऐतिहासिक स्थळांच्या प्रती इतके असंवेदनशील झाले आहेत की, रंगबेरंगी प्रकाश योजना वापरुन हे पवित्र स्मारक डिस्कोथेक सारखे दिसत आहे. एक शिवभक्त म्हणून मी मनातून दु:खी झालो असून या प्रकारचा मी तीव्र निषेध करतो असं खासदार संभाजीराजे भोसले यांनी सांगितले आहे.

...मात्र रायगड अंधारात ठेवू नका

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी किल्ले रायगडला भेट दिली होती. यावेळी किल्ल्यावरील महत्वपूर्ण वास्तू, छत्रपती शिवरायांची मूर्ती अंधारात असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी तातडीने त्यांनी पुरातत्व विभागाचे राजेंद्र यादव यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. रायगडावर विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यासाठी मागणी केली. मात्र, विद्युत रोषणाई करण्यासाठी आवश्यक फंड नसल्याचे यादव यांनी सांगितले. त्यावेळी श्रीकांत शिंदे यांनी जो काही फंड लागेल मी देतो, मात्र रायगड अंधारात ठेवू नका अशा सूचना केल्या होत्या.

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीAjit Pawarअजित पवारSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजShrikant Shindeश्रीकांत शिंदेShiv Senaशिवसेना