शहरं
Join us  
Trending Stories
1
"थोडं थांबा, ४ जूननंतर कुठे रांग लागते हे..."; सुनील तटकरेंच्या दाव्यावर शरद पवार गटाचं प्रत्युत्तर
2
जयंत पाटील काँग्रेसमध्ये जाणार? शिंदे गटाचे नेते म्हणाले, “रोहित पवारांमुळे पक्षाबाहेर...”
3
"एका समाजासाठी काम करत असाल तर..."; अमोल मिटकरींचा मेधा कुलकर्णींवर पलटवार
4
"मोदींच्या साधनेमुळे वातावरण सुधारले, उष्णतेपासून दिलासा मिळाला’’, रवी किशन यांनी केला दावा  
5
बदललेले रक्त बिल्डर 'बाळा'च्या आईचे? आज मोठा खुलासा होणार, पोलिसांना लीड मिळाले...
6
भाजपा स्वबळावर जिंकू शकत नाही, ... एवढी बेगमी ते करतील; लोकसभा निकालावर भाकीत
7
Punjab National Bank : 'या' सरकारी बँकेतून लोन घेणं महागणार, वाढणार EMI; पाहा किती झाला Interest Rate?
8
“४ जूनला इंडिया आघाडी जिंकतेय, देशाची चॉइस पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आहेत”: संजय राऊत
9
आता शिरूरमध्ये पोर्शे अपघाताची पुनरावृत्ती! पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप; दोघांना उडवलं, एकाचा मृत्यू
10
"४६ सेकंदात २० अँगल... कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?"; विरोधकांचा PM मोदींवर निशाणा
11
“देशाला पुढे नेण्यात एकटे PM मोदी अन् फडणवीस पुरेसे नाहीत”; भाजपा खासदाराचे विधान चर्चेत
12
भारतीय क्रिकेटपटूची १.५ कोटींची जमीन अधिकारी-भूमाफियांनी लाटली; कागदपत्रांत हेराफेरी, बाप फेऱ्या मारतोय
13
Gautam Adani : गौतम अदानींनी मुकेश अंबानींना टाकलं मागे, बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती
14
“पोलीस आयुक्तांना नेहमी फोन करतो”; पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणी अजित पवार स्पष्टच बोलले
15
Life lesson: भूतकाळात झालेल्या चुकांचे ओझे वर्तमानात घेऊन वावरू नका; करा 'हा' उपाय!
16
Rules Changed From 1st June 2024: १ जूनपासून ड्रायव्हिंग लायसन्ससह बदलले 'हे' नियम, SBI च्या ग्राहकांसाठीही मोठी अपडेट
17
इंडिगोच्या विमानात पुन्हा बॉम्बची धमकी; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
18
आम्ही जरांगे: दमदार भूमिकेत अजय पूरकर; साकारणार अण्णासाहेब पाटील यांची भूमिका
19
Tarot card: कोणतेही कारण असो, थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय; ही शिकवण देणारा आठवडा!
20
“काँग्रेसचा दारुण पराभव होणार असल्यानेच एक्झिट पोल चर्चांमध्ये सहभागी होणार नाही”: अमित शाह

महिला शिवभक्तांनी आणली शिवज्योत; किल्ले रायगड ते बिरवाडी दौड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2020 11:04 PM

अनेक ठिकाणी साहसी खेळांचे प्रात्यक्षिक

बिरवाडी : किल्ले रायगड ते महाड तालुक्यातील बिरवाडी हे ३५ किलोमीटरचे अंतर महिला शिवभक्तांनी शिवज्योत हातामध्ये घेऊन गुरुवारी पार केले आहे. महाड तालुक्यातील नवजीवन मित्रमंडळ टाकी कोंड बिरवाडी यांच्या वतीने शिवजयंती उत्सव सोहळ्याच्या औचित्याने दरवर्षी तरुण शिवज्योत घेऊन येतात. मात्र यंदा महिला शिवभक्तांनी सहभाग घेऊन शिवज्योत आणली. या वेळी शिवभक्त शीतल कदम /गोगावले, रेश्मा कदम, नीलम साळवी, अमृता तार, सीमा जाधव, सायली शिंदे यांनी शिवजयंती उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या शिवज्योत मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला.

वडवली येथे रक्तदान शिबिरश्रीवर्धन तालुक्यातील वडवली येथे शिवजयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. वडवली गावातील सहकार्य सामाजिक संस्था व वडवली आगरी युवा संघटना, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात ६३ जणांनी रक्तदान केले. अलिबाग येथील रायगड जिल्हा शासकीय रक्तपेढी यांनी रक्त संकलित केले. येथील डॉ. दीपक गोसावी आणि सहकारी यांच्या मदतीने रक्त संकलन करण्यात आले.इतिहासकालीन शस्त्रसाहित्याचे प्रदर्शनरेवदंडा : मुरूड-जंजिरा तालुक्यातील साळावमधील शिवमर्दानी आखाड्यात शिवजयंतीच्या औचित्याने इतिहासकालीन शस्त्र साहित्याचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. प्रदर्शनाला मुरूड पंचायत समितीचे उपसभापती चंद्रकांत मोहिते, शिवसेना संपर्कप्रमुख भगिरथ पाटील, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला शिवप्रतिमेला उपस्थितांनी पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांचे स्वागत व प्रदर्शन भरवण्याच्या हेतूबाबत प्रास्ताविक आखाड्याचे संस्थापक किशोर चवरकर यांनी केले. आखाड्याच्या अध्यक्षा सुरेखा चवरकर, प्रशिक्षक शुभम चवरकर, आखाड्याचे मावळे उपस्थित होते.‘दिघी नाक्याचे नामकरण श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक करा’म्हसळा : दिघी नाकाचे नामकरण श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक करा, अशी मागणी गुरुवारी शिवप्रेमींकडून करण्यात आली. शिवजयंती गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तसेच शिवसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवजयंती उत्सवात रायगडावरून शिवज्योत, पालखी, श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्ररथ तसेच साहसी प्रात्यक्षिके सादर करण्यात आली.