शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

रायगडावर दिमाखात रंगणार शिवराज्याभिषेक सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 03:13 IST

पोलिसांचा चोख बंदोबस्त, पार्किंगची सुविधाही मिळणार

अलिबाग : किल्ले रायगडावर १ ते ७ जून रोजी तिथी आणि तारखेनुसार ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा दिमाखात साजरा करण्यात येणार आहे. गडावर शिवभक्तांची होणारी गर्दी पाहता कोणतीही गैरसोय होणार नाही. पाण्याच्या योग्य नियोजनासह, आरोग्य व्यवस्थाही चोख करण्यात आली आहे. पाेलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून, पार्किंगची कुठेही गैरसोय होणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या पत्रकार परिषदेला जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील हेही उपस्थित होते. कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.  गडावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमही प्रशासनातर्फे आयोजित केले जातील, असे डॉ. योगेश म्हसे यांनी सांगितले. 

गडावर १० लाख लिटर, पाचाड येथे ५० लाख लिटर पाण्याची व्यवस्था केली आहे. १०९ सीसीटीव्ही, एलईडी सुविधा, ३०० शौचालय आणि १०० स्नानगृह सुविधा आहे. २४ मेडिकल सेंटर प्रत्येक ३०० मीटरवर एक आरोग्य सेंटर देण्यात आले आहे. डॉक्टर, परिचारिका, औषध तसेच स्ट्रेचर, व्हीलचेअर सुविधा ही करण्यात आली आहे. दरम्यान, १७० पोलिस अधिकारी, १२०० पोलिस कर्मचारी, ३५० होमगार्ड, १ एसआरपी प्लाटून तैनात असणार आहे. 

मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदीमुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे  १६ टन पेक्षा अधिक अवजड वाहनांना महामार्गावर बंदी घालण्यात आलेली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी ते पळस्पे, वाकण फाटा ते खोपोली व इतर राज्य मार्गांवरून होणारी वाळू, रेती भरलेल्या ट्रक, मोठे ट्रेलर्स तसेच अवजड वाहनांना बंदी  आहे. ३१ मे  रोजी रात्री १२ वाजल्यापासून  ०२ जून  रोजी रात्री १२ वाजेपर्यंत तसेच ०४ जू रोजी १२ वाजल्यापासून ते ०६ जून रोजी रात्री १२ वाजेपर्यंत ही बंदी असेल.   

शिवराज्याभिषेक सोहळा  घरी बसूनही शिवभक्त, नागरिक पाहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. शिवभक्तांनी नियमाचे पालन करावे, असे आवाहन आहे.-डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी, रायगड

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाRaigadरायगड