शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले रायगडावर रंगणार शिवराज्याभिषेक दिन, बंदोबस्तासह शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 10:51 IST

दोन हजार पोलिस किल्ले रायगड आणि परिसरामध्ये तैनात राहणार आहेत. ७०० शासकीय कर्मचारी आणि १२० स्वयंसेवकही या ठिकाणी काम करणार आहेत.

महाड : येत्या ६ जून रोजी किल्ले रायगडावर ३५१ वा श्री शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्याकरिता देशभरातून लाखो शिवभक्त दाखल होणार आहेत. त्यांच्या सोयी-सुविधांसाठी रायगडावर जिल्हा प्रशासनामार्फत तयारी केली आहे. यावेळी दोन हजार पोलिस किल्ले रायगड आणि परिसरामध्ये तैनात राहणार आहेत. ७०० शासकीय कर्मचारी आणि १२० स्वयंसेवकही या ठिकाणी काम करणार आहेत. जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक अतुल झेंडे यांच्यासह अन्य दोन पोलिस उपाधीक्षक, ११ पोलिस उपविभागीय अधिकारी, २८ पोलिस निरीक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षक, १४० पोलिस उपजिल्हाध्यक्ष, ९०० पोलिस कर्मचारी १३५ वाहतूक पोलिस तसेच पोलिस दलाची विविध पथके या ठिकाणी दाखल होणार आहेत.पिण्याच्या पाण्याची सुविधा किल्ले रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा प्रशासनाकडून करण्यात आली आहे. याकरिता गडावरील विविध ठिकाणी असलेल्या तलावातील पाणी एकत्रित केले आहे. त्याचप्रमाणे गडावर पिण्याच्या पाण्याची असुविधा होऊ नये म्हणून प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात पुरविण्यात येणार आहेत. त्याचप्रमाणे टँकरचेदेखील नियोजन करण्यात आले आहे. 

 कोंझर, पाचाड  येथे पार्किंग सोय  वाहनांची पार्किंग करण्यासाठी प्रशासनाकडून कोंझर आणि पाचाड येथे सुविधा केलेली आहे. या ठिकाणी शिवभक्तांनी आपली वाहने पार्क करून तेथून एसटीने रायगडकडे सोडण्यात येणार आहे. महाड एसटी आगाराकडून याकरिता एसटी बस मागविण्यात आलेल्या आहेत. 

रोपवे दिवस-रात्र सुरू राहणारआरोग्य विभागाची पथकेदेखील या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. चित्त दरवाजा येथून पायी चालत जाणाऱ्या शिवभक्तांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या सुविधेसाठी गडावर आणि पायरी मार्गावर वैद्यकीय पथके आणि कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. रायगड रोपवेदेखील शिवभक्तांकरिता दिवस-रात्र सुरू राहणार आहे. या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी शासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे.

टॅग्स :Raigadरायगड