शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

किल्ले रायगडावर १२ एप्रिलला शिवपुण्यतिथी; गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 07:01 IST

लोकमान्य टिळकांनी १८९५ साली श्री शिवाजी महाराज रायगड स्मारक मंडळ स्थापन केले. तेव्हापासून रायगडावर शिवपुण्यतिथी कार्यक्रम केला जातो.

लोकमत न्यूज नेटवर्क, अलिबाग : किल्ले रायगडावर शनिवारी, १२ एप्रिलला ३४५ वी शिवपुण्यतिथी तसेच शिवसमाधी जीर्णोद्धार शताब्दी अभिवादन कार्यक्रम साजरा होत आहे. या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी सोमवारी दिली. 

अलिबाग येथील कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. लोकमान्य टिळकांनी १८९५ साली श्री शिवाजी महाराज रायगड स्मारक मंडळ स्थापन केले. तेव्हापासून रायगडावर शिवपुण्यतिथी कार्यक्रम केला जातो.

कार्यक्रमाची रूपरेषायंदाच्या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारमंत्री अमित शाह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहणार आहेत.  दोन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात शुक्रवारी समाधीला दीपवंदना दिली जाणार आहे. जगदीश्वर प्रांगणात कीर्तन आणि जागर होणार आहे. राज सभेत शाहीर सुरेशराव सूर्यवंशी यांचा ‘ही रात्र शाहिरांची’ हा कार्यक्रम होणार आहे.  रात्रीचे भोजन, निवास, सकाळची न्याहारी आणि महाप्रसाद याची व्यवस्था मंडळातर्फे करण्यात आली असल्याचेही आंग्रे यांनी सांगितले.  

दुर्ग नीळकंठ रामदास पाटील यांना पुरस्कारदरवर्षीप्रमाणे यंदाही श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्काराचे वाटप मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.  यंदाचा पुरस्कार दुर्ग अभ्यासक नीळकंठ रामदास पाटील यांना प्रदान करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे वंशज उदयसिंह होळकर आणि निवृत्त लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती रघुजीराजे आंग्रे यांनी दिली.

सीसीटीव्ही दुरुस्ती सुरूमुंबई : रायगड किल्ल्यावरील समाधी परिसर सोडता, इतर सीसीटीव्ही रायगड विकास प्राधिकरणाच्या अखत्यारीतील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कक्षाने लावले आहेत. तसेच, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या अखत्यारीतील सीसीटीव्ही दुरुस्ती सुरू आहे, असे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असणाऱ्या भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणच्या मुंबई मंडळाच्या वतीने कळविण्यात आले आहे. 

टॅग्स :RaigadरायगडFortगडShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजAmit Shahअमित शाह