शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Aditi Tatkare: महाविकास आघाडीत बिघाडी? आदिती तटकरेंना पालकमंत्री पदावरून हटविण्यासाठी शिवसेनेची मोहिम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2022 19:07 IST

Aditi Tatkare: महाविकास आघाडीत बिघाडी? आदिती तटकरेंना पालकमंत्री पदावरून हटविण्यासाठी शिवसेनेची मोहिम

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकमंत्र्यांना हटवण्यासाठी शिवसेनेची मोहीम

मनमानी कारभारा विरोधात तीनही आमदार घेणार मुख्यमंत्र्यांची भेटलाेकमत न्यूज नेटवर्करायगड  : राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आघाडीमधील प्रमुख घटक पक्षामधील कुरबुरी वाढल्या आहेत. दोन्ही पक्षात टोकाचे मतभेद झाल्याने  रायगड  जिल्ह्यातील  पालकमंत्रीच बदलावा  या दिशेने शिवसेनेने मोहिम आखली आहे.  याबाबत महाडचे शिवसेना आमदार भरत गोगावले यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसवर कडाडून टीका केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात राजकीय संघर्ष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

रायगड जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि  रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे या मनमानी कारभार करत असल्याचा थेट आरोप शिवसेनेने केला आहे. रायगडसाठी शिवसेनेचाच पालकमंत्री  पाहीजे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे  करण्यात येणार आहे.  रायगडच्या पालकमंत्री यांना बदलावे यासाठी शिवसेनेचे तिन्ही आमदार एकवटले आहेत. महाडचे आमदार भरत गोगावले यांनी आज पत्रकार परिषदेत घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांना पदावरुन हटविण्याची मागणी केली आहे. यावरून जिल्ह्यात आघाडीत बिघाडी झाल्याचे यावरून दिसून येते. नुकत्याच झालेल्या नगरपंचायतींच्या निवडणूकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकां विरोधात चांगलेच आक्रमक झाले होते. त्यानंतर आता शिवसेनेच्या आमदारांनी शड्डू ठोकल्याचे दिसून येते. राष्‍ट्रवादी काँग्रेसच्‍या आदिती तटकरे या मनमानी कारभार करत आहेत. सहकारी म्‍हणून कोणत्याही कामात विश्‍वासात घेत नाहीत, असा आरोप आमदार गोगावले यांनी केला. महाविकास आघाडीचा अडीच वर्षाचा कार्यकाळ देखील पूर्ण होत आहे त्याकरिता मंत्रिमंडळ फेररचनेत रायगड चे पालकमंत्री पद शिवसेनेकडे असावे मग तो शिवसेनचा पालकमंत्री कोणीही द्या तो आम्हाला मान्य असेल. आज माणगाव पासून रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा पालकमंत्री हटाव मोहिमेला सुरुवात झाली असल्याचे आमदार भरत गोगावले यांनी स्पष्ट केले. याबाबत  जिल्ह्यातील शिवसेनेचे तीनही आमदार मुख्‍यमंत्री उदधव ठाकरे यांची भेट घेणार असल्‍याचे गोगावले यांनी सांगितले. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे हे सोबत असल्‍याचा दावा गोगावले यांनी केला.राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेसचे सरकार असल्याने सर्वसमावेशक कारभार होणे अपेक्षीत होता मात्र तसे होत नसल्याचे आमदार गोगावले यांनी सांगितले. सत्तेमध्ये असतानाही शिवसैनिकांची कामे होत नाहीत. त्‍यामुळे आमदारांसह शिवसेनेचे पदाधिकारी देखील पालकमंच्‍या काराभारावर नाराज आहेत. त्‍यामुळे ही नाराजी वर्षावर पोहोचवली जाईल असेही आमदार गोगावले यांनी स्पष्ट केले.याप्रसंगी जिल्‍हाप्रमुख अनिल नवगणे, राजीव साबळे, माणगावचे नव निर्वाचित नगराध्‍यक्ष ज्ञानदेव पवार, प्रमोद घोसाळकर यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या तोंडावर दोन्ही पक्षातील संघर्ष हा शिगेला पोहचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत आता वरिष्ठ पातळीवर काय निर्णय होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.                                                    

टॅग्स :Aditi Tatkareअदिती तटकरेShiv Senaशिवसेना