शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
3
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
4
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
5
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
6
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
7
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
8
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
9
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
10
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
11
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
12
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
13
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
14
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
15
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
16
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
18
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
19
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
20
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते

भाजी विकायला गेली म्हणून वाचली; पण मुलगा, पतीसह संसार ढिगाऱ्याखाली गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 08:32 IST

...पण पती, मुलगा गमावून बसली

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग : नेहमीप्रमाणे शेतात पिकलेली भाजी काढून ती पनवेल बाजारात विक्रीस गेली. घरी नवरा, मुलगा. मात्र, गुरुवार हा तिच्या कुटुंबासाठी काळ ठरेल, अशी पुसटशी कल्पनाही तिच्या मनात नव्हती. भाजी विकण्यास गेल्याने ती दरड दुर्घटनेत वाचली. मात्र, तिचा पती आणि मुलगा दरड दुर्घटनेत गाडले गेले. तारी पारधी हिची ही दुःखद कहाणी आहे. इर्शाळवाडी आदिवासी दरड दुर्घटनेत नवरा पांडू पारधी, मुलगा अबोस पारधी हे मरण पावल्याने तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

तारी ही आपला पती आणि मुलासोबत पन्नास वर्षांपासून वाडीत वास्तव्य करीत आहे. घरच्या शेतीवर पारधी कुटुंबाची गुजराण सुरू होती. शेतात पिकवलेली भाजी घेऊन डोंगर उतरून रोज पाच-सहा किलोमीटर चालत मुख्य रस्त्यावर येऊन पनवेलला विकायला जात होती. बुधवारीही तारी नेहमीप्रमाणे भाजी विकण्यास पनवेल येथे गेली होती. तर पती आणि मुलगा हे घरीच होते. बुधवारी तारी ही पनवेलला आपल्या नातेवाईकांकडे राहिली. परंतु, इकडे रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास इर्शाळवाडीवर डोंगरातील मातीचा ढिगारा कोसळून उभारलेला तारीचा संसार गाडला गेला.  सकाळी दुर्घटनेबाबत कळल्यावर तातडीने ती गावात आली. मातीचा ढिगारा पाहून तिने हंबरडा फोडला. मेहनतीने उभा केलेला संसार एका झटक्यात उद्ध्वस्त झाला. आता उरला तो मातीचा ढिगारा आणि कुटुंबाच्या आठवणी.

टॅग्स :RaigadरायगडRaigad Irshalwadi Landslide Incidentरायगड इर्शाळवाडी दुर्घटना प्रकरण