शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Women's Day Special: सरकारी नोकरीचा त्याग करुन 'तिने' तीस महिलांना दिली रोजगाराची संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2020 06:49 IST

Women's Day Special: शिलाई उद्योगाच्या माध्यमातून अलिबागमधील महिलांची आर्थिक भरारी

आविष्कार देसाई अलिबाग : एक महिला म्हणून महिलांसाठी काही तरी करण्याची जिद्द स्वस्थ बसू देत नव्हती. शेवटी निर्णय घेत सरकारी नोकरीला ठोकर मारत ‘पल्लवी स्वयंसहायता उद्योगा’च्या माध्यमातून तब्बल ३० महिलांच्या हाताला स्वाभिमानाचे काम दिले. सर्व महिलांच्या हिमतीच्या बळावरच शिलाई उद्योगाच्या माध्यमातून भरारी घेत महिन्याला प्रत्येक महिलेच्या हातात किमान सहा हजार रुपये पडत आहेत.

अलिबाग तालुक्यातील सुप्रिया नाईक यांनी रायगड जिल्हा परिषदेमध्ये तब्बल २५ वर्षे कारकुनी केली. त्यांचे पतीही याच ठिकाणी कामाला होते. पदरामध्ये तीन मुली असल्याने आई म्हणून त्यांचे भविष्य घडवण्यासाठी नोकरी करत होत्या. मात्र त्यांच्यातील एक महिला त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. महिलांसाठी काही तरी करण्याची त्यांची धडपड सुरूच होती. नोकरीच्या जंजाळामुळे मनासारख्या कामाला वेळ देता येत नसल्याने अखेर सुप्रिया यांनी सरकारी नोकरीला ठोकर मारत व्हीआरएस घेतली आणि एक मोकळा श्वास घेतला.उमेदीच्या कालावधीत त्यांनी शिवणकामाचे प्रशिक्षण घेतले होते. सुरुवातीला कपडे शिवण्याची छोटी-मोठी कामे मिळत होती. त्यासाठी त्यांना प्रचंड मेहनत घ्यावी लागत होती. कालांतराने हळूहळू जिद्दीच्या जोरावर शाळा, महाविद्यालय, सरकारी रुग्णालये येथील गणवेश शिवण्याचे टेंडर मिळत गेले. त्यामुळे आता कामाची कमतरता त्यांना भासत नाही.

परिश्रम, जिद्द बाळगल्यास कोणतेही काम शक्यएक महिलाच महिलांचे दु:ख जाणू शकते. नोकरी करताना गरजू महिलांसाठी काही तरी करावे असे वाटत होते. महिलांनी त्यांच्या पायावर उभे राहिले पाहिजे. कठोर परिश्रम आणि जिद्द उराशी बाळगली तर जगातील कोणतेही काम महिलांच्या आवाक्याबाहेर नाही. महिलांनी आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐकायला शिकले पाहिजे, असे नाईक आवर्जून सांगतात.

टॅग्स :Women's Day Specialजागतिक महिला दिन