शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
4
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
5
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
6
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
7
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
8
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
9
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
10
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
11
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
12
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
13
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
14
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
15
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
16
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
17
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
18
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
20
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की

भविष्यात रायगडमधील शेती नामशेष होण्याची भीती- शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2019 06:36 IST

पनवेलमधील विद्यालयात शतक महोत्सवाचे आयोजन

पनवेल : एकेकाळी भाताचे कोठार म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील शेती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. भविष्यात जिल्ह्यात शेती शिल्लक राहील की नाही, याची काळजी वाटते. याठिकाणी मोठ्या प्रमाणात कारखानदारी वाढणार असल्याने अशा परिस्थिती टिकुन राहण्यासाठी युवा पिढीला गुणवत्ता पूर्वक शिक्षणाची गरज असल्याचे मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पनवेल येथे व्यक्त केले. व्ही. के. (विठोबा खंडाप्पा) विद्यालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.सध्याच्या घडीला रायगड जिल्ह्यात कारखानदारी वाढत चालली असल्याने युवा पिढीने गुणवत्ता पूर्वक शिक्षणाची गरज आहे. शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाला आपला पाठिंबा असून फक्त त्या कौशल्य, गुणवत्ता असणे गरजेचे असल्याचे पवार यांनी नमूद केले. व्ही. के. विद्यालयाचे माजी विद्यार्थी व राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी देखील पनवेलमधील शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. शरद पवार यांचा पक्ष वेगळा असला तरी नगरसेवक ते खासदार असेपर्यंत वेळोवेळो त्यांचे मागदर्शन लाभल्याने विचार जोशी यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थितांमध्ये व्ही. के. विद्यायालचे अध्यक्ष आमदार बाळाराम पाटील, खासदार सुनील तटकरे, माजी खासदार रामशेठ ठाकूर,आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार विवेक पाटील, मीनाक्षी पाटील, विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जे एम म्हात्रे, कोएसोचे अध्यक्ष संजय पाटील आदींसह शाळेचे माजी विद्यार्थी व राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.व्ही. के. विद्यालयाला शंभरवर्ष पूर्ण झाल्याने शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या शतक महोत्सवाचे आयोजन केले. याकरिता विद्यार्थ्यांनी वर्गणी काढली होती. शतक महोत्सवी वर्ष साजरा करण्यासाठी मागील महिनाभरापासून विद्यार्थी तसेच शाळेचे चेअरमन आमदार बाळाराम पाटील हे प्रयत्नशील होते.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवार