शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

महाडमधील केंबुर्ली गावात भीषण पाणीटंचाई; नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 00:58 IST

दासगाव-वहूर नळपाणीपुरवठा बंद झाल्याने समस्या

दासगाव : महाड शहरापासून अवघ्या दोन किमी अंतरावर असलेल्या केंबुर्ली गावामध्ये सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. केंबुर्ली गावातील होळीचा माळाची हीच अवस्था झाली असून या ठिकाणीदेखील पाण्याचा कोणताच स्रोत उपलब्ध नसून दासगाव-वहूर नळपाणीपुरवठा बंद असल्याने पाण्याचा भीषण प्रश्न निर्माण झाला आहे. सध्याच्या परस्थितीमध्ये संपूर्ण गावामध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

केंबुर्ली गावाला कोथुर्डे धरणातून नळपाणीपुरवठा योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जातो. नेहमी वीज बिल तक्रार, कोथुर्डे धरणातून सोडण्यात येणारे पाणी अशा अनेक समस्यांना या गावाला सामोरे जावे लागते. ऐन उन्हाळ्यात कोथुर्डे धरणाची पातळी घटते. याचा फटकाही कायम बसतो. कोथुर्डे धरणातून या ठिकाणी पाणीपुरवठा केला जात असला तरी वारंवार पाणी समस्या, वीज बिल समस्या निर्माण होत असल्याने दरवर्षी या गावाचा डिसेंबरपासून पाणीपुरवठा बंद राहतो. या गावातील दोन्ही विहिरी मे महिन्याच्या आतच आटून जातात. त्यामध्ये एक विहीर गावापासून दोन किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी इतर पाण्याचे कोणतेच स्रोत नसल्याने केंबुर्ली गावाला पाण्याचे कोणतेच साधन उपलब्ध नाही.

या गाव हद्दीतून दासगाव गावाला जाणाऱ्या नळपाणीच्या पाइपलाइनमधून थेंबेथेंबे करून रात्र घालवून संपूर्ण गाव पाणी भरण्याचे. मात्र आता दासगाव नळपाणीपुरवठा ठप्प झाल्याने या ठिकाणी टँकरशिवाय पर्याय उरलेला नाही. केंबुर्ली गावाला ही समस्या गेल्या वीस वर्षांपासून भेडसावत आहे. येथे प्रशासन, राजकीय लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. गावाची ही परिस्थिती पाहता ग्रामस्थांनी यूएफआय कमिटी तयार केली असून या कमिटीमार्फत टँकरद्वारे गावामध्ये पाणीपुरवठा करण्यास सुरुवात केल्याने ग्रामस्थांना आधार मिळाला आहे.

कोथुर्डे धरणाचे पाणी बंद झाले की केंबुर्लीला भीषण पाणीटंचाई निर्माण होते. प्रशासनाने यावर लक्ष देणे गरजेचे आहे. नवीन विहिरी बांधून देणे किंवा बोअरवेल देणे गरजेचे आहे. मात्र प्रशासन वारंवार दुर्लक्ष करत आहे. या ठिकाणी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात यावा याकरिता पंचायत समितीकडे मागणी केली आहे. शिवाय महाड एमआयडीसीकडूनही पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा केला जावा याकरिता मागणी केली आहे.- सादिक घोले, सरपंच, केंबुर्ली

टॅग्स :WaterपाणीRaigadरायगड