शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

व्यापा-यांना लुटणा-या सात जणांना ४८ तासांत केली अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2017 01:21 IST

कर्जत - कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर गाडी आडवी घालून लुटण्याचा प्रयत्न केल्यानंतर नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपास सुरू केला होता. अवघ्या ४८ तासांत सात लुटारूंना ताब्यात घेतले असून आणखी काही तरु णांचा शोध नेरळ पोलिसांचे पथक घेत आहे.

कर्जत : कर्जत - कल्याण राज्यमार्ग रस्त्यावर गाडी आडवी घालून लुटण्याचा प्रयत्न केल्यानंतर नेरळ पोलिसांनी गुन्हा दाखल होताच तपास सुरू केला होता. अवघ्या ४८ तासांत सात लुटारूंना ताब्यात घेतले असून आणखी काही तरु णांचा शोध नेरळ पोलिसांचे पथक घेत आहे.पनवेल येथील व्यापारी दर शनिवारी बदलापूरपासून कर्जत आणि खोपोलीपर्यंत दिलेल्या घाऊक मालाची वसुली करण्यासाठी येत असतात. पनवेल करंजाडे येथील सद्दीक खान हे आपल्या अन्य चार सहकारी व्यापारी मित्रांसह या भागात आले होते. त्याची माहिती गाड्या लुटणाºया टोळीला असल्याने सायंकाळी साडेसात वाजता त्यांची एमएच ४६ एन ११०५ ही कार नेरळ येथून कर्जत रस्त्याने जात होती. पंचवटी भागात असताना त्यांच्या कारच्या समोर तवेरा गाडी आडवी आणून उभी करण्यात आली. तीन दुचाकी देखील मागे येऊन उभ्या राहिल्या. त्या चार गाड्यांमधून आलेल्या लुटारूंनी प्रथम गाडीच्या काचा फोडून त्यापैकी एकाने गाडी ताब्यात घेतली आणि ५-६ किलोमीटर लांब जंगलात नेली. तेथे त्या व्यापाºयांना मारहाण करून शस्त्रांचा धाक दाखवून त्यांच्याकडे असलेल्या पैशाची मागणी केली. लूटमार व त्यांच्याबरोबर झालेल्या झटापटीत व्यापारी सद्दीक खान आणि आलोक सिंग हे जखमी देखील झाले. त्यांच्याकडे असलेले मोबाइल फोन, रोख रक्कम, दोघांच्या अंगावर घातलेली जीन्स पॅन्ट काढून घेत त्यांच्या गाडीसह तेथून पलायन केले. जंगलातून रस्ता शोधत ते व्यापारी साडेदहा वाजता नेरळ पोलीस ठाण्यात पोहचले. नेरळ पोलिसांच्या पथकाने रात्री लूटमार करणाºया टोळीमधील सात जणांना पकडून आणले. लूटमार करणारे स्थानिक असल्याने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. अंबरनाथ, कर्जत तालुक्यातील हालीवली, शिरसे, पोसरी, बारणे, पेण तालुक्यातील कामार्ली येथील हे सर्व लूटमार करणारे आहेत. या सर्व सात जणांवर गुन्हा दाखल असून पोलीस उपनिरीक्षक शेंगडे अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Crimeगुन्हाArrestअटक