शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

उपचाराविना पाठवले घरी; दुसऱ्या दिवशी मुलाचा मृत्यू: डॉक्टरांकडून हलगर्जीचा कुटुंबीयांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 11:18 IST

मुलावर उपचार न करता त्याला परत घरी पाठवण्यात आले. दुसऱ्या दिवशी गर्वांगचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, माणगाव : माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या १४ वर्षीय शाळकरी मुलाला उपचाराविनाच घरी पाठविल्यानंतर दुसऱ्या दिवशीच त्याचा मृत्यू झाल्याने आरोग्य विभागाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. म्हसळा तालुक्यातील घुम गावात राहणाऱ्या या मृत मुलाचे नाव गर्वांग दिनेश गायकर असे असून, उपचाराअभावीच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. 

गर्वांगच्या पायावर केसपुळी आल्याने शुक्रवारी त्याला म्हसळा ग्रामीण रुग्णात उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यानंतर त्याला ताप आल्याने शनिवारी, ५ एप्रिलला रात्री त्याला १०८ रुग्णवाहिकेच्या साह्याने माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे नेण्यात आले. येथे त्याच्यावर उपचार न करता त्याला परत घरी पाठविण्यात आले. दुसऱ्या दिवशी गर्वांगचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. 

कठोर कारवाईची मागणीगर्वांग याच्या मृत्यूला रुग्णालयातील डॉक्टरच जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणानंतर शिवसेना आक्रमक झाली असून, त्यांनी रुग्णालयाला भेट देऊन याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी पक्षाकडून करण्यात आली आहे

डॉ. सावंत व डॉ. राप्ते यांनी रुग्णाला तपासल्यानंतर तो व्यवस्थित असल्याने त्याला घरी पाठविले. वरिष्ठांकडून यासंदर्भात कारवाई प्रस्तावित करण्यात आली असून मुलाला आणि त्याच्या आई-वडिलांना १०० टक्के न्याय मिळेल. डॉ. महेश मेहता, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, माणगाव

उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे रुग्णाला तपासले असता ॲडमिट करण्याची आवश्यकता वाटली नाही, असे तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. कोणतीही रक्त तपासणी न करता तापाच्या गोळ्या देऊन रुग्णाला घरी पाठवण्यात आले. या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल.  डॉ. किरण शिंदे, सहायक जिल्हा शल्यचिकित्सक, अलिबाग (रायगड)

टॅग्स :RaigadरायगडHealthआरोग्यhospitalहॉस्पिटल