शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटी-चांदणी चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत सुरक्षा रक्षकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 16:34 IST

आर्थिक नुकसान भरपाईसाठी मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांचा नकार: २४ तास मृतदेह रुग्णालयातच

मधुकर ठाकूरउरण : जेएनपीटीत खासगी सुरक्षा रक्षक म्हणून  काम करणाऱ्या रोशन केळकर यांचा शुक्रवारी (२०) रात्री जेएनपीटी-चांदणी चौकात अज्ञात वाहनाच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. मृताच्या नातेवाईकांनी जोपर्यंत जेएनपीटी आर्थिक नुकसान भरपाईची घोषणा करीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मृताचे कुटुंबिय, रायगड सुरक्षा रक्षक महामंडळाचे सदस्य आणि येथील काही कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही यासाठी जेएनपीटीच्या हॉस्पिटल समोर ठिय्या मांडला. त्यामुळे २४ तास मृतदेह रुग्णालयातच होता. जेएनपीटीने दिलेल्या आश्वासनानंतरच मृतदेह ताब्यात घेण्यात आला. 

जेएनपीटी टाऊनशीप येथे कार्यरत असलेले सुरक्षा रक्षक रोशन केळकर (रा.कोटनाका-उरण) हे 20 सप्टेंबर रोजी रात्रपाळीत काम करीत होते.गुरुवारी रात्री आपल्या अन्य सहकाऱ्यांसोबत करळफाटा ब्रिज आणि चांदणी चौक परिसरात ट्राफिक कंट्रोलसाठी गस्त घालीत होते. त्याच दरम्यान चांदणी चौक येथे अज्ञात वाहनाने  रोशन यांना जोरदार धडक दिली.उपचारासाठी जेएनपीटीच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

  दरम्यान अपघातांची माहिती मिळताच रायगड सुरक्षा रक्षक महामंडळाचे सदस्य आणि येथील काही कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.त्यांनी अपघाती वाहनाचा सर्वत्र शोध घेण्याचाही प्रयत्न केला.मात्र अज्ञात वाहनाने घटनास्थळावरून केव्हाच पलायन केले होते. पोलिसांनाही खबर दिल्यानंतरही अपघाती वाहन अथवा वाहनचालकही सापडला नाही.त्यामुळे संतप्त. झालेल्या रायगड सुरक्षा रक्षक महामंडळाचे सदस्य आणि येथील काही कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी जेएनपीटीकडून कुटुंबाला नुकसान भरपाई मिळत नाही आणि अपघात करणाऱ्या वाहनाचा शोध लागत नाही,जोपर्यंत  न्हावा शेवा पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास  नकार दिला.तसेच सकाळी जेएनपीटी हॉस्पिटलसमोर जमलेला जमाव आणि रायगड सुरक्षा रक्षक महामंडळाचे सदस्य, माजी कामगार ट्रस्टी रविंद्र पाटील, भूषण पाटील, सुरेश पाटील,उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाळ पाटील आणि येथील काही कामगार संघटनांच्या पदाधिकारी आणि मृतांच्या नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केले.

   परिस्थिती चिघळण्याची शक्यता निर्माण झाल्याने जेएनपीटीने तत्काळ शनिवारी सकाळी बैठक घेतली.मुंबई हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसारच जेएनपीटी टाऊनशीप येथे कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना पगार न करण्याची धमकी देऊन तसेच त्यांना ट्राफिक कंट्रोलचे कोणतेही प्रशिक्षण न देताच  जबरदस्तीने करळ फाटा ब्रिज परिसरामध्ये वाहतूक पोलिसांना मदतनीस (ट्राफिक वार्डन)म्हणून काम करण्यास पाठवणारे जेएनपीटीच्या अधिकाऱ्यांविरोधात जोरदार आवाज उठविला.जेएनपीटी अधिकाऱ्यांवर बेजबाबदारपणाचे आरोप करीत बैठकीत उपस्थितांनी मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक नुकसान भरपाईची घोषणा होईपर्यंत मृतदेहही ताब्यात घेण्यात येणार नाही अशी तंबीही देण्यात आली. त्यामुळे वठणीवर आलेल्या जेएनपीटी अधिकाऱ्यांनी मृताच्या कुटुंबीयांना सीएसआर फंडातून आर्थिक मदत देण्याची घोषणा केली.त्याचबरोबर रायगड सुरक्षा रक्षक महामंडळाचे सदस्य असलेल्या मृताच्या कुटुंबीयांना मंडळाकडून विविध प्रकारचे आर्थिक लाभ मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील असे आश्वासनही देण्यात आले.त्यानंतर सुरक्षा रक्षक रोशन केळकर यांचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती न्हावा शेवा बंदर पोलीस विभागांचे एसीपी विठ्ठल दामगुडे यांनी दिली.

टॅग्स :JNPTजेएनपीटीAccidentअपघात