School of teachers in the bar at the bar | वेळास येथे बांधावर भरली चिमुकल्यांची शाळा
वेळास येथे बांधावर भरली चिमुकल्यांची शाळा

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील वेळास आदर्श शाळेत ‘एक दिवस शेतीचा’ उपक्रम राबविण्यात आला. या निसर्गरम्य उपक्रमात मुला-मुलींनी उत्साही सहभाग घेतला होता. शाळेत मुले शिक्षण तर घेतातच पण त्या व्यतिरिक्त मुलांना आपल्या आईवडिलांच्या कष्टाची जाणीव व्हावी, शेतकरी शेतात कसे कष्ट करतो व धान्य पिकवतो हे प्रत्यक्षात बघता यावे यासाठी वेळासमधील सर्व विद्यार्थ्यांनी शाळेकडून शेतीविषयक माहिती घेतली तसेच प्रत्यक्ष शेतीचे काम कसे करतात याचा अनुभव घेतला.
या उपक्रमाचा प्रारंभ लहानग्यांना रानावनातील भटकंतीचा आनंद देत करण्यात आला. शेतीबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळावी यासाठी त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आपण जेवण जेवताना अन्न जास्त झाले तर सहजपणे टाकतो. पण त्यामागे अन्न उगवणाऱ्यासाठी शेतकºयाच्या कष्टाची जाणीव व्हावी व शेतीची औजारे कशी हाताळावी, औजारांची प्रत्यक्ष ओळख, मुक्या जनावरांबद्दल महत्त्व व त्यांच्याबद्दल प्रेम वाढावे यासाठी आज सर्व विद्यार्थ्यांना एक दिवस शेतीचा म्हणून प्रत्यक्ष शेतात लावणी करायला नेण्यात आले. लावणी करून प्रत्यक्षरीत्या शेतीचा विद्यार्थ्यांनी अनुभव घेतला. विशेष म्हणजे, वेळास शाळेकडून शेतीच्या हंगामात हा उपक्रम राबविला जातो.
या वेळी विद्यार्थ्यांना एक वेगळाच अनुभव मिळाला आहे. उपक्रमाप्रसंगी शिक्षक विश्वनाथ नागे, रामेश्वर जाधव, लीना बोरकर व गावातील शेतकऱ्यांनी समरस होऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला.


Web Title: School of teachers in the bar at the bar
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.