शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायास कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
3
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
4
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
5
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
6
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
7
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
8
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
9
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
10
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
11
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट
12
छत्रपती संभाजीनगरात खंडपीठाला बॉम्बने उडवण्याची धमकी; कोर्टात शोध मोहीम, पोलिस अलर्ट
13
करिअर, कुटुंब आणि आर्थिक व्यवस्थापन कसे करावे? सोप्या ६ टीप्स वापरा आणि टेन्शन फ्री व्हा
14
'पाच दिवसांत व्हिडीओ काढून टाका...', दिल्ली उच्च न्यायालयाचा रामदेव बाबांना दणका
15
पुन्हा परतला कोरोना, महाराष्ट्राशेजारील या राज्यात एका महिलेच्या मृत्यूने खळबळ, सापडले एवढे रुग्ण
16
रस्त्याच्या कामासाठी लावलेलं लोखंडी बॅरिकेड वृद्ध महिलेवर कोसळलं, थरारक व्हिडिओ व्हायरल!  
17
एक बायको गावात, दुसरी शहरात! नववधूची १५ दिवसांत फसवणूक; पतीने गर्लफ्रेंडशी केलं लग्न
18
कामावरून घरी परतला अन् पत्नीचा मृतदेह पाहून हादरला; विक्रोळीतील खळबळजनक घटना
19
"संसद सर्वोच्च आहे, तिच्या वर कोणीही नाही"; टीकेनंतरही उपराष्ट्रपती जगदीप धनखड मतावर ठाम
20
सोन्याची किंमत पहिल्यांदाच १ लाख रुपयांच्या पुढे! तुमच्या शहरात एका तोळ्याचा भाव काय?

उरण तालुक्यातील जासई, दिघोडे चिरनेर आदी तीनही ग्रामपंचायतींवर महाआघाडीचेच सरपंच :  भाजपचा सफाया   

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 14:18 IST

प्रभाग क्रमांक ४ मधुन महाआघाडीच्या भारती मनोज ठाकूर या याआधीच बिनविरोध निवडून आल्याने महाआघाडीला शुभशकुन मिळाला होता.

मधुकर ठाकूर

उरण : उरण तालुक्यातील जासई, दिघोडे चिरनेर आदी तीनही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत महाआघाडीने भाजपला चितपट केले आहे.तीनही ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंचापदासह सदस्यांचाही बहुमताचा आकडा पार करून निर्विवाद सत्ता काबीज केली आहे. उरण तालुक्यातील चिरनेर ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत महाआघाडी विरोधात भाजप असा सामना रंगला होता.सरपंचासह १७ जागांसाठी पाच प्रभागातुन ३० उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते.

प्रभाग क्रमांक ४ मधुन महाआघाडीच्या भारती मनोज ठाकूर या याआधीच बिनविरोध निवडून आल्याने महाआघाडीला शुभशकुन मिळाला होता.भाजपच्याच धनदांडग्यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामांमुळेच मागील काही वर्षांपासून ऐतिहासिक चिरनेर गावाला पावसाळ्यात सातत्याने पुराचा सामना करावा लागत आहे.निवडणूकीच्या प्रचारात प्रमुख मुद्दा बनला होता . याच मुद्यानी भाजपची नौका मतदारांनी अरबी समुद्रात बुडविली. निवडणूकीच्या प्रचारात भाजपच्या महेश बालदी, प्रशांत ठाकूर या दोन्ही आमदारांनीही जाहीर सभा घेऊन मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला होता.मात्र महाआघाडीचे सरपंचपदाचे उमेदवार भास्कर मोकल (३१२८ मते) यांनी भाजपचे उमेदवार प्रतिक गोंधळी(१२२४ मते) यांना १९०४ मतांनी पराभूत केले.तर सदस्यपदाच्या १५ पैकी १४ जिंकून ग्रामपंचायतीवरही निर्विवादपणे सत्ताही काबीज केली आहे.   दिघोडे ग्रामपंचायतीत सत्ताधारी भाजप विरोधातकॉंग्रेस, शेकाप आघाडी अशीच लढत झाली.मागील निवडणुकीत ग्रामपंचायतीवर भाजपने सत्ता स्थापन केली होती.मात्र निवडणुकीत दिलेल्या एकाही आश्वासनाची पुर्तता भाजपच्या सत्ताधाऱ्यांना केलेली नाही . याचाच फायदा उठवत कॉंग्रेस -शेकाप आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार किर्तीनिधी ठाकूर (१२३७ मते)यांनी भाजपचे मयुर घरत (७९३ मते)यांचा ४४४ मतांनी पराभव केला आहे. महाआघाडीचे ९ पैकी ९ सदस्य निवडून आल्याने ग्रामपंचायतीवरही महाआघाडीने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.   लोकनेते दिवंगत दिबांचे जन्मगाव असलेल्या जासई ग्रामपंचायतींमध्ये सर्वपक्षीय इंडिया महाआघाडी विरोधात भाजप अशी सरळ लढत झाली.सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीची थेट सरपंच  आणि १७ अशी १८ सदस्य संख्या आहे.यामधुन इंडिया महाआघाडीच्या सृष्टी म्हात्रे यांची याआधीच बिनविरोध निवड झाली आहे.त्यामुळे सरपंच व उर्वरित १६ सदस्यपदासाठी निवडणूक झाली. सर्वपक्षीय इंडिया महाआघाडीचे १७ पैकी १२ सदस्य निवडून आले आहेत.तर सरपंचपदी इंडिया महाआघाडीचे संतोष घरत (१९२५ मते) यांनी भाजपचे बळीराम घरत (१७७३ मते ) यांचा १५२ मतांनी पराभव केला आहे.  निवडणूकीत विजयी मिळवण्यासाठी ग्रामपंचायतींमध्ये विविध राजकीय पक्षांच्या प्रचार रॅली,सभा घरोघरी जाऊन प्रचाराचा धुरळा उडविला होता.मतदारांना विविध आमिषे दाखवून आकर्षित करण्यासाठी आटोकाट प्रयत्नही केले होते.मात्र सुजाण, सुशिक्षित मतदारांनी मतदानाचा कौल भाजप विरोधात दिला आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक