शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘राजसदरेजवळील अडथळे दूर करावेत’, संभाजीराजे यांची पुरातत्त्व विभागाकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 06:46 IST

Raigad News : रायगड किल्ल्यावर असणाऱ्या राजसदरेवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी लाखो शिवप्रेमी रायगडावर येत असतात.

महाड - रायगड किल्ल्यावर असणाऱ्या राजसदरेवरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी लाखो शिवप्रेमी रायगडावर येत असतात. परंतु या ठिकाणी पुरातत्व  विभागाने लावलेले बॅरिकेड्स राजसदरेला शोभनीय नाहीत. त्यामुळे ती तत्काळ काढावीत, अशी मागणी पुरातत्त्व विभागाकडे केली असल्याची माहिती रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.लॉकडाऊननंतर सध्या रायगडावर रायगड संवर्धनाची कामे सुरू झाली आहेत. रायगडावर येणाऱ्या पर्यटकांकडून शुल्क वसूल करण्याकरिता पुरातत्व विभागाने चित्त दरवाजा येथे तिकीट खिडकी उघडली आहे. ही तिकीट खिडकी रायगडाच्या सुशोभीकरणाला बाधा आणणारी आहे. तसेच ती योग्य प्रकारची नसल्याची अनेक तक्रारी शिवप्रेमींनी खासदार संभाजीराजे यांच्याकडे केलेल्या होत्या, त्या तक्रारीदेखील पुरातत्व विभागाचे अधीक्षक राजेंद्र यादव यांच्याकडे पाठवण्यात  आल्या असल्याचेही त्यांनी  सांगितले. रायगडावर येणाऱ्या शिवप्रेमींना राजसदरेवर जाण्याची इच्छा असते; परंतु याकरिता काही नियम घालून देणे आवश्यक असले तरीही  यासाठी अटकाव करू नये, अशी भूमिका ही संभाजीराजे यांनी  मांडली.  कामे पुन्हा सुरूरायगडावर जाण्यासाठी चित्त दरवाजा तेंव्हा दरवाजापर्यंत हाती घेण्यात आलेली पायऱ्यांची कामे तसेच संरक्षक कठडे यांची कामे पुन्हा सुरू करण्यात आलेली आहेत. चित्त दरवाज्याच्या दर्शनीय भागामध्ये केलेल्या पायऱ्यांच्या कामासाठी चुना, गूळ बेलफळ यांचे मिश्रण वापरले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :RaigadरायगडSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपती