शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

उधाणाच्या तडाख्याने बांधबंदिस्ती फुटल्याने हजारो एकर शेतीत खारे पाणी, शेतकरी हवालदिल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2023 17:18 IST

उरण परिसरातील खारलँड विभागाने खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्तींच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने भात शेतीचे  संरक्षण करणारी बांधबंदिस्ती उध्दवस्त होत आहेत.

मधुकर ठाकूर

उरण : उरण पुर्व विभागातील पिरकोन,आवरे, गोवठणे, बांधपाडा ग्रामपंचायत हद्दीतील पारंगी, सांगपाले ,काशी,पारंगी,रेवचावळा या  खाडीकिनाऱ्यावरील खार बांधबंदिस्ती समुद्रातील उधाणाच्या पाण्यात उध्दवस्त झाली आहेत.त्यामुळे समुद्रातील खारे पाणी शेत जमीनीत शिरल्याने लागवडी खाली असलेली भातशेती नष्ट होऊन हजारो एकर भात शेती नापीक  होण्याचा धोका निर्माण झाला आहे.या परिसरातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी मात्र पुरता हवालदिल झाले आहेत.

उरण परिसरातील खारलँड विभागाने खाडी किनाऱ्यावरील बांधबंदिस्तींच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने भात शेतीचे  संरक्षण करणारी बांधबंदिस्ती उध्दवस्त होत आहेत. १९ जुलैच्या समुद्राच्या मोठ्या उधाणाच्या  खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्ती फुटल्याने समुद्रातील खारे पाणी हे भात शेतीत शिरल्याने हजारो एकर भातशेती उध्दवस्त होऊन भातशेतीचा चिखल  झाला आहे. समुद्रातील खारे पाणी हे शेत जमीनीत शिरूर पिरकोण,आवरे, गोवठणे, बांधपाडा ( खोपटा ) ग्रामपंचायत हद्दीतील पारंगी,सांग पाले खार,काशी,पारंगी,रेवचा वळा खार या परिसरातील हजारो एकर भात शेती नापीक होण्याच्या मार्गावर लागली आहे.खारलँड विभागाच्या अधिकाऱ्यांनी सदर शेतीची पाहणी करून तातडीने खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्तीची कामे मार्गी लावली नाहीतर समुद्राच्या उधाणाचे पाणी रहिवाशांच्या घरात शिरेल अशी भीती पिरकोन येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांनी व्यक्त केली आहे.

उरण तालुक्यातील आवरे, गोवठणे , बांधपाडा , पिरकोण सारख्या इतर ग्रामपंचायत हद्दीतील खाडीकिनाऱ्यावरील बांधबंदिस्ती फुटल्याने समुद्राचे पाणी हे भात शेतीत शिरले आहे.त्या संदर्भात खारलँड विभागाकडून पाहणी करून तशा प्रकारचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात आला असल्याची माहिती पेण खारलँड विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश सावंत यांनी दिली.

टॅग्स :uran-acउरण