शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

'रोहिदास’ला खडक लागला; सात जण सुखरूप; नौकेचे १५ लाखांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2024 11:40 IST

या घटनेमध्ये या बोटीचे १५ लाखांचे नुकसान झाले आहे...

आगरदांडा : तालुक्यामधील राजपुरी कोळीवाड्यातील ४ सिलिंडरच्या यंत्रचलित मासेमारी नौकेला नांदवली दीपस्तंभ मणेरी खडकाजवळ अपघात झाला. यामध्ये नौका खोल समुद्रात बुडाली. बोटीवरील ७ जणांनी वेळीच समुद्रात उड्या घेतल्या. तसेच दुसरी बोट त्यांच्या मदतीला धावून आल्याने ते सर्वजण वाचले. दिगंबर नारायण चव्हाण यांच्या मालकीची रोहिदास बोट होती. या घटनेमध्ये या बोटीचे १५ लाखांचे नुकसान झाले आहे. 

बुधवारी सकाळी ६ वाजता दिगंबर नारायण चव्हाण, नारायण पद्मा चव्हाण, मयुरेश नारायण चव्हाण, लहू महादेव मालीम, सोमनाथ धनंजय चव्हाण, लहू पद्मा वासकर, प्रदीप परशुराम वासकर, व ६ खलाशी ही बोट घेऊन मासेमारीसाठी जात होते. नांदवली दीपस्तंभ मणेरी या समुद्रात आली असता बोटीला पंख्यामध्ये खडक लागला. यात बोटीत पाणी भरू लागले. नाखवा दिगंबर चव्हाण यांनी त्वरित त्याच परिसरात मासेमारी करणाऱ्या गंगासागर बोटीचे मालक दिलीप आगरकर यांना संपर्क करीत माहिती दिली.  आगरकर यांनी आपली बोट त्वरित घटनास्थळाकडे वळवली. मात्र तोपर्यंत रोहिदास बोट बुडू लागली होती. बोटीवर असणारे नाखवा व सहा खलाशी यांनी समुद्रात उड्या मारल्या. नशिबाने आगरकर बोटीसह तेथे पाेहोचले, त्यामुळे ते सर्वजण वाचले. 

एका खलाशावर उपचार सुरु  :  लहू पद्मा वासकर यांच्या नाकातोंडात पाणी शिरल्याने तब्येत बिघडली होती. त्यांना मुरुड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्याला अलिबाग येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.  

टॅग्स :Raigadरायगड